Press "Enter" to skip to content

रोह्यात व्यापाऱ्यांकडून ११ वाजता शटर बंद ! तरीही नागरिक रस्त्यावरच

विनाकारण फिरणाऱ्याना वेसण घालणार कोण ?

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

सबंध महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्याला कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आणि अंशतः लॉक डाऊन केला होता.त्यामधे नवीन नियमावली नुसार सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली.परंतु आजही रुग्णांची संख्या वाढतच आहे.दिलेल्या वेळेत व्यापाऱ्याकडून दुकानाची शटर डाऊन आहेत.मात्र काहीही कारण नसताना रोह्यासह धाटाव,कोलाड परिसरात नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

काल पासूनच ११ च्या ठोक्याला रोह्यात व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाची शटर डाऊन केले होते.रस्त्यावरील वर्दळ सुद्धा कमी झाली होती.परंतु दुकाने बंद झाल्यानंतरही शहरासह धाटाव,कोलाड परिसरात सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाल्यानंतर काही युवक,नागरिक काहीही काम नसताना फिरताना दिसून येत आहेत.बाजारपेठ बंद असताना शहरात हे युवक,नागरिक कशासाठी फिरत आहे?अत्यावश्यक सेवा संचारबंदी काळातही सुरू राहत असल्याने तेंव्हाच आपली कामे उरकून घेण्यात यावी असे काही सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.

प्रशासनाने याकडे लक्ष देऊन काही कामं नसताना शहरात फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केल्यास कोरोना संसर्ग कमी होऊ शकेल.त्याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहेत.

एकंदरीत रोह्यात व्यापाऱ्यांकडून ११ वाजता शटर बंद करीत मिळणारा प्रतिसाद पाहता नागरिक मात्र तरीही विनाकारण मोटासायकलस्वार तर काही पादचारी रस्त्यावरच फिरताना पहावयास मिळत आहेत.आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन विनाकारण घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करीत असताना बिनकामी विनाकारण फिरणाऱ्याना आता वेसण घालणार कोण? असाही प्रश्न समोर येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.