Press "Enter" to skip to content

विखरण येथे कोविड लसीकरण उत्सव उत्साहात संपन्न

पहिल्याच दिवशी 218 गावकऱ्यांनी लसिकरणाचा घेतला लाभ

सिटी बेल । रामकृष्ण पाटील । नंदुरबार ।

नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे कोवीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या लसीकरण शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेखर रौंदळ व मुख्य कार्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, केंद्रप्रमुख संजय कुवर, विखरण येथील सरपंच छायाबाई बापू पाटील, ग्रामसेवक
एस.डी.गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज कदम, डॉ. मनिष नांद्रे डॉ. हेमांगी आगळे गावाच्या पोलिस पाटील दिपमाला प्रकाश पाटील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत विखरण, श्री.आप्पासो. आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा विखरण रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबिर आयोजीत करण्यांत आले होते.

लसीकरण उद्घाटन सोहळ्यानंतर वय वर्षे 45 व त्यापुढील नोंदणीकृत नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी लसीकरण काळाची गरज मृत्यूचे धोके टाळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व या विषयी आपल्या भाषणातून मार्गदर्शनातून केले.तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शेखर रौंदळ यांनी लसीकरण मोहीम यशस्वीरित्या संपन्न होत असल्यामुळे ग्रामपंचायत विखरण व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी विखरण येथील लसीकरण मोहीम अंतगॅत शिक्षकांनी केलेल्या नोंदणीचा आढावा,लसीकरणाने मानवी जीवन अबाधित ठेवण्यासाठी आज एक काळाची गरज याविषयीची माहिती सांगितले.लसीकरणाची सुरुवात विखरण गावातील प्रथम नागरिक, सरपंच छायाबाई बापू पाटील यांनी पहिली लस घेऊन केले. गावातील नागरिकांनी covid-19 च्या प्रतिबंधात्मक बाबींचे अनुपालन करून उस्फुर्त प्रतिसाद देऊन शिस्तीने लाईनीत उभे राहून लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष लसीकरण कामी सिस्टर श्रीम.रेखा बाविस्कर,श्रीम.जयश्री कानडे, श्रीम.कल्पना गोसावी, आरोग्यसेवक पी.जी. ब्राह्मणे, श्रीम. हिना वळवी, गटप्रवर्तक सरला अहिरे यांनी कामकाज पाहिले. लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विखरण येथील उपसरपंच सुनिता चंदू पवार, सदस्य निर्मला रोहिदास मराठे, ईश्वर शिवाजी मराठे, सुमन सुरेश मराठे, दिलीप नागो पाटील, भारती केशव पाटील, धर्मा पंडीत भिल, उखडी बाई कृष्णा भिल, ग्राम पंचायत कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग, रोटेरियन प्रा.निशिकांत शिंपी, राहुल पाटील, किशोर नारायण साळुंके, रोहिदास बारकू मराठे, बापू विश्राम पाटील,केशव वामन पाटील, भास्कर गबा पाटील, जलसुरक्षक महादु यादव भील, विलास संजय भीम, रवींद्र गुलाब पाटील, सुरेश लक्ष्‍मण मराठे, अंगणवाडी सेविका अनिता रविंद्र पाटील, प्रमिला गोविंदा पाटील, प्रतिभा अरुण सोनी, सुरेखा कैलास पाटील, आशा वर्कर माधुरी ज्ञानेश्वर पाटील, रत्‍नाबाई अनिल पाटील समस्त ग्राम वाशियांनी केले. तसेच देवरे विद्यालयाचे उपशिक्षक के.पी. देवरे, एम.डी.नेरकर, वाय.डी. बागुल, लिपिक आर.एम. पाटील, शिपाई एस. जी.पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक एस. एस.बोरसे, जयश्री सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन विद्याययाचे उपशिक्षक डी.बी.भारती यांनी तर लसीकरण कार्यक्रमाचे आभार देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.