सिटी बेल । पाणदिवे । मनोज पाटील ।
विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील हे उलवे पंचक्रोशीत व्हि. डी. पाटील या नावाने सर्वत्र चर्चेत होते. पाटील कुटूंबांत त्यांचा खुप मोठा मान असायचा. आपल्या मतावर ठाम असलेले, कोणतीही पर्वा न करणारे आणि जे बोलेले ते करुन दाखवणारे असे हे एकवचनी आणि दानशुर व्यक्तीमक्त होते. ते आपल्या हजरजबाबीने, आगरी बोली भाषेतील काव्यांतुन आपल्या गोड आवाजात विशेष मुद्द्यांवर खास टिप्पणी करण्यात माहीर होते.
काही दिवसांपुर्वी पाटील यांची तब्येत थोडी खालावली गेली, त्यांना कफामुळे दम लागत राहिल्यामुळे त्या आजारावर उपचार घेत असताना अचानक त्यांना कोविड १९ या महामारीने ग्रासले आणि विष्णूशेठ यांना नवी मुंबई सेक्टर १० सानपाडा येथील न्यु मिलेनियम ह्या कोविड सेंटर हॉस्पिटलात गुढीपाडव्याच्या दिनी भरती केले, त्यांच्यावर उपचार दरम्यान त्यांची रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली. तेथील डॉक्टरांनी खुप शर्तीचे प्रयत्न केले शेवटी काळाने घाला घातलाच. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्मास चिरशांती देवो. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, दोन सुना आणि दोन नाती आणि असंख्य असे पाटील कुटूंबीय परिवार आहे. विष्णूशेठ यांच्या अकस्मात निधनाने पाटील परिवारावर कधी न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
विष्णूशेठ यांची दशक्रिया विधी ही मंगळवारी २७ एप्रिल रोजी श्री. श्रेत्र लांगेश्र्वर मोरावे तर उत्तरकार्य विधी गुरुवारी २९ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी उलवे सेक्टर २१, भुखंड क्रमांक- ६,७,८ आय. आर. एस. टॉवर मधे होणार आहे, तरी पाटील परिवाराचे ज्यांना सात्वंन करायचे असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचे दुखवटे आणू नये शिवाय प्रत्येकाने मास्क आणि सोशल डिस्टंसींगचा पालन करायचे आहे असे निलेश विष्णू पाटील यांनी आवाहन केले आहे.








Be First to Comment