Press "Enter" to skip to content

सुधागड तालुका स्मारक कमिटीचे माजी अध्यक्ष मनोहर कदम यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ व धडाडीचे कार्यकर्ते मनोहर कदम यांचे दुःखद निधन, चळवळीची मोठी हाणी मान्यवरांची शोकाकुल प्रतिक्रिया

सिटी बेल । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

सुधागड तालुका स्मारक कमिटीचे माजी अध्यक्ष तथा आंबेडकरी बहुजन चळवळीतील सक्रिय व धडाडीचे कार्यकर्ते मनोहर धर्माजी कदम (आप्पा)यांचे दि. (20) मंगळवार रोजी नवघर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते. कदम यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची खूप मोठी हाणी झाली असून कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची शोकाकुल प्रतिक्रिया अंत्ययात्रेस उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

मनोहर कदम यांनी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. प्रत्येक सामाजिक , सेवाभावी उपक्रमात त्यांचा सहभाग असे. समाजाला दिशा देण्याबरोबरच तरुणांना मार्गदर्शन करण्याचे देखील त्यांनी काम केले. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांच्या गोड स्वभावाने ते सर्वाना आपलेसे वाटत. ते  शिस्तप्रिय होते. बहुजन समाजात देखील त्यांचा परिचय व लोकप्रियता अधिक होती  अडीअडचणीत, संकटात सापडलेल्या व्यक्तींना ते सतत मदतीचा हात देत. भुकेलेल्या तहानलेल्या व्यक्तींना अन्नदान करून त्यांनी नेहमीच सेवाभावी वृत्ती जोपासली. फुले, शाहू, आंबेडकरी परिवर्तनवादी व पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता.

संपूर्ण आयुष्यभर त्यांनी आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन काम केले. त्यांच्या निधनाने नवघर सह सुधागड तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पछात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.