Press "Enter" to skip to content

येरळ डोंगरालगत प्रचंड वणवा,अनेक वृक्ष भस्मसात

गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील डोंगरांना वणवे लागण्याचे प्रकार मार्च महिन्यापासून सुरू असून असाच एक प्रकार येरळ येथे घडला. येरळ येथील डोंगरानजिक प्रचंड प्रमाणावर वनवा दोन दिवसांपूर्वी लागला होता. या वणव्यात अनेक वृक्ष भस्मसात झाली असुन गु्रांचा चारा ही जळून खाक झाल्याने गु्रांच्या चाऱ्यांचा प्रश्न ऐराणीवर आला आहे.

हा वणवा सायंकाळी सात वाजता लागलेला समजताच बाळकृष्ण आयरे, रुपेश आयरे, राजन आयरे, विशाल प्रमोद मालुसरे, नितीन वाघमारे, पांडू पवार तसेच येरळ ग्रामस्थांनी रात्री अकरा वाजेपर्यंत हा प्रचंड प्रमाणावर लागलेला वणवा मोठ्या शर्थीने आटोक्यात आणला. वणव्यात आगीचा ओघ एवढा मोठा होता की ही आग क्षणार्धात पावणे दोनशे एकरात गेली.

यामध्ये आंब्याची कलमे, जांभूळ, चाफा, करवंदाच्या जाळ्या तसेच अन्य महत्त्वाचे वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. येथील उर्वरित शंभर एकर जमिनी कडे जाणारी आग थांबल्यामुळे येथील हजार वृक्षांना जीवदान मिळाले. या परिसरामध्ये सातत्याने ५०० च्या पुढे परिसरातील गुरे चरण्यासाठी सातत्याने येत असतात. या परिसरामध्ये गुरांसाठी चारा असल्याने नेहमी या परिसरात सातत्याने गुरे येत असतात. तो चारा उर्वरित १०० एकरा मध्ये वाचला आहे. हे वारंवार लागणारे वणवे कोण लावतो याचा शोध घेणे आवश्यक आहे.

असे वणवे लागत गेले तर जंगलातील लहान-मोठे वृक्ष करवंदाच्या जाळ्या नष्ट होतील त्यामुळे जंगली प्राणी निवाऱ्यासाठी गावात येऊन त्रास देतील. वणव्या बाबत अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये आवाज उठविला गेला मात्र जंगल खाते यावर कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.