Press "Enter" to skip to content

पावसाळ्यात वस्तू ची साठवण कशी करायची ? ग्रामीण भागात मोठा प्रश्न

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली की पावसाळ्यामध्ये भेडसावणाऱ्या वस्तूची साठवण करण्यासाठी लगबग असते.एप्रिल महिन्यामध्ये जवळ – जवळ सर्वच वस्तू एकत्र जमविण्यासाठी बाजारपेठ लगबग असते सर्वच दुकाने खरेदी साठी सज्य असते.मात्र गेल्या वर्षापासून आलेल्या कोरोना संकट मुळे प्रत्येक जण घराच्या बाहेर न पडता घरामध्येच राहत आहे. त्यातच कोरोना मात्र मध्यानंतरी कोरोना नियंत्रणात येत असतांना पुन्हा कोरोना या विषाणू यांने पाय पसरण्यास सुरुवात झाली असून तो नियत्रणांत यावा यासाठी पुन्हा एकदा संचार बंदि करण्यात आली आहे.

यामुळे पावसाळ्यात लागणा-या जिवनाश्यक वस्तु कश्या प्रकारे साठवण करायची हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.कोरोना पसरु नये किंवा त्याच्या कोणी संपर्कात येवू नये यासाठी ही संचार बंदी अंमलात आनली गेली आहे.

विशेष म्हणजे महिला वर्ग महिला वर्ग जंगलात निर्माण होणारी करवंदे आंबे,तसेच काही वस्तू विक्रीसाठी बाजार पेठेत येत असतात. मात्र गेले काही दिवस बाजार पेठ कोरोना मुळे भरत नसल्यामुळे वस्तूची साठवण केव्हा होणार. एप्रिल महिन्यात प्रत्येकांच्या दारी मसाला बनविण्यासाठी मिरची आवर्जून खरेदि केली जाते. मात्र कोरोनाच्या भितीने आणी संचार बंदि मुळे मिरची ची खरेदी होत नसून ग्रामीण भागात मिर्ची प्रत्येकांच्या घरी वाळत घातलेली दिसतच नाही.जंगलात निर्माण होणारी भाजी वाळवून ती पावसाळ्यात खाण्यासाठी तीचा वापर होत असतो मात्र यावर्षी चित्र थोडे वेगळे निर्माण झाले आहे.

मात्र कोरोना हा नियंत्रणात आला असता तर बाजार पेठेत सर्वच वस्तू मिळल्या असत्या.मात्र अजून किती दिवस जातील याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. पावसाळ्यात लागणा-या वस्तू ची साठवण कशी होणार हाच प्रश्न चिन्ह सर्वांना चिंतेने ग्रासले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.