साई मदत कक्ष या सामाजिक संघटनेचा उपक्रम
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हा दिवस म्हणजे शालिवाहन सवंस्तराचा पहिला दिवस आणि हिंदू पंचागानुसार या दिवसाच अनन्यसाधारण महत्व आहे …आणि ह्याच पवित्र दिवसच औचित्य साधत येरवडा येथील मनोरुग केंद्रातील मनोरुन बांधवांचा देखील पाडवा सण आनंदात साजरा व्हावा त्यांना देखील काहीतरी गोडधोड जेवणाचा आस्वाद घेता यावा म्हणून याच उदात्त हेतूनं त्यांना उत्तम प्रकारच्या स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना आणि सर्वांना मदतीचा हात पुढे करणारी संघटना .. साई मदत कक्ष ..
ह्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर श्री माने साहेब ,यांच्या विशेष सहकार्याने आणि साई भक्त ..श्री संजू भाऊ पवळे, श्री राकेश दादा मुंगळे ,श्री रवीशेठ इंगळे, ह्या सर्व मंडळींच्या औदार्यातून येरवडा येथील मनोरुग्ण केंद्रातील तब्बल अकराशे मनोरुग्ण बांधवांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले. साई मदत कक्ष…ह्या संघटनेतील कोविड १९ योद्धा आणि दानशूर व्यक्तिमत्त्वांच्यां सहकार्यातून साकारलेल्या ह्या प्रेरणादायी कार्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.










Be First to Comment