Press "Enter" to skip to content

मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेतकरी वर्गाची होत आहे परवड


कृषीनिष्ठ शेतकरी मारूती तुपकर यांनी व्यक्त केली खंत

सिटी बेल । रोहा । शरद जाधव ।

शेतकरी बांधवांचे हितासाठी शासनाकडून विविध कृषीविषयक योजना राबविल्या जातात,उद्देश हाच की शेतकरीवर्ग सम्रुद्ध व्हावा.परंतू राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकरी वर्गापर्यंत किती पोहोचतात आणि पोहोचल्या तरी शेतकरी वर्गाची कशी परवड होते याची अनेक उदाहरणे तालुक्यात पहावयास मिळत आहेत.त्यातीतलच एक योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे ही योजना. या योजनेतंर्गत शेतकरीवर्गाने मोठ्या आशेपोटी शेततळी खोदली आहेत.परंतू मिळणाऱ्या अनुदानाच्या बाबतीत मात्र शेतकरी वर्गाची परवड होताना दिसत आहे.अशाप्रकारची तक्रार तालुक्यातील शेतकरी मारूती तुपकर यांनी पत्रकारांशी याबाबत माहिती देताना व्यक्त केली आहे.

शेततळे या योजनेतंर्गत परवड सोसावी लागणारे तुपकर यांनी आपले म्हणणे मांडताना देशाचा पोशिंदा असणारा शेतकरी वर्ग जगला पाहिजे. त्याने केवल शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपुरक व्यवसायांवरही भर दिला देऊन आपले जीवनमा उंचावले पाहिजे.याकरिता कृषी खात्याकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतू राबविलेल्या योजना शेतकरी वर्गापर्यंत खरोखर किती पोहोचतात.हा संशोधन व चिंतेचा विषय होऊन बसला आहे.त्यामुळे क्रुषी खात्याकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतांश शेतकरीवर्गाची नापसंती दिसत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

तर शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना आणून त्याची अमंलबजावणीही केली.त्यामुळे शेतकरी वर्गाने या योजनेतंर्गत अनुदानापोटी आपापल्या पिकत्या शेतजमिनीमध्ये शेततळे खोदले.शेततळे खोदून अनुदानाचा पत्ताच नसल्याने शेतकरीवर्गाची याबाबत परवड निर्माण झाली आहे.शेतीला पुरक व्यवसाय म्हणून म्हणून शेतकरी वर्गाने पदरमोड करून शेततळी खोदली आहेत.परंतू गेली दोन वर्षे अनुदानाच मिळाले नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजीची भावना व्यक्त होऊ लागली आहे.त्यातच अनुदान मिळेल की नाही या द्विधा मन:स्थितीत शेतकरी वर्ग सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लक्ष घालून शेतकरी वर्गाचु समस्या समजावून घ्यावी असे शेवटी तुपकर यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.