विकी पाटील युवा प्रतिष्ठान तर्फे सिडकोला निवेदन
सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।
दिवंगत दिपक चौथुराम कासूकर वय 36, दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 5 नंतर आपल्या दुचाकी (गाडी नंबर MH 46 A S 5835 ) ने जात असताना उरण तालुक्यातील फुंडे गावाजवळ असलेला सिडकोचा ब्रिज कोसळला. त्यात दिपक कासूकर यांचे दुःखद निधन झाले. सदर ब्रिज निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व सिडकोच्या दुर्लक्षामुळे कमी कालावधीमध्ये कोसळला. या घटनेची संपूर्ण जबाबदारी सिडकोची आहे. दिपक कासूकर हा सिडकोच्या भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरला आहे. दिपक यांच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर खूप मोठे दुःख कोसळले आहे. सर्वसामान्य कुटूंबातील दिपक यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी व इतर मागण्यांसाठी विकी पाटील युवा प्रतिष्ठान तर्फे सिडको संचालक, अभियंता,उरणचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
जबाबदार सिडको अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, या अपघाताची जबाबदारी सिडकोने घेऊन अपघात ग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करावे. मृत पावलेल्या तरुणाच्या पत्नीस सिडको मध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, मृत कुटुंबांस 50 लाख रुपये रोख रक्कम नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विकी युवा प्रतिष्ठान तर्फे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, अभियंता सिडको, तहसीलदार उरण यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यावेळी विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी पाटील, नितीन म्हात्रे, राकेश पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष -सुदेश पाटील, टायगर ग्रुप उरण तालूकाध्यक्ष -आकाश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.सिडकोच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई व्हावी व दिपक कासूकर यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेतूनही खूप मोठया प्रमाणात होऊ लागली आहे.








Be First to Comment