Press "Enter" to skip to content

कळंबोली पोलिसांकडून रोडपाली कातकरी वाडीमध्ये धान्य वाटप

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।  

सध्या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर तळागळातील गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून कळंबोली परिसरात असलेल्या कातकरीवाडीतील गरजू बांधवांना धान्य वाटप वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कळंबोली पोलीस ठाणेकडून पोलीस ठाणे हद्दीतील रोडपाली जवळील फूडलँड कंपनीच्या मागील कातकरीवाडीमध्ये 50 ते 60 गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. सदरवेळी मास्क व सामाजिक अंतर पालन करण्यात आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.