Press "Enter" to skip to content

किल्ला ग्रामस्थांसाठी तब्बल १ कोटी २८ लाखांची पाणी योजना


अनेक वर्षात कोणाला जमले नाही ते पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी करून दाखविले

सिटी बेल । रोहा । शरद जाधव ।

रोहे तालुक्यातील किल्ला ग्रा. पंचायत हद्दीतील ग्रामस्थांची पाण्याची गरज ओळखुन ग्रांपंचायतीसाठी मंजूर केलेल्या १ कोटी २८ रूपयांची पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पुर्ण होईल अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. तर गेल्या अनेक वर्षात कोणाला जमले नाही ते पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी करून दाखविले असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

धाटाव औद्योगिक वसाहती जवळच किल्ला हे गाव मोडत आहे.तर किल्ला गाव औद्योगिक क्षेत्रात मोडूनही गावाचा म्हणावा तितकासा विकास झाला नाही.तर आजही गावात कुठलीही विशेष शासकीय योजना नाही. बिर्ला कंपनीचे पाणी ग्रामस्थांना मिळत आहे.

राजकारण हे दिवसेंदिवस बदलत असते.त्याला किल्ला गावही अपवाद नाही.आज किल्ला गावचे विकास कामांसाठी तटकरे यांची युवा पिढी पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे विशेष प्रयत्न करीत आहेत.किल्ला गावात राजकीय क्षेत्रात विशेष बदल होत आहेत. तर नुकतेच भाजपमध्ये असलेल्या सरपंच योगेश बामुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने गावाचे राजकीय चित्रच बदलून गेले आहे.तसेच तरुणवर्गही राष्ट्रवादीकडे विशेष आकर्षित होताना दिसत आहे.

किल्ला गावचा भविष्यकालीन विकासाचा आराखडा खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्यापुढे मांडला असून भविष्यात विकासाचा बँकलाँक त्यांच्याच माध्यमातून भरून काढला जाईल अशाप्रकारचे भावना ग्रामस्थांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केली आहे.तर प्रगतीपथावर आलेल्या नळपाणी योजनेचे कामाची पाहणी करण्याकरिता उपस्थित अधिकारी वर्गाने लवकरच काम मार्गी लागेल अशीही माहिती त्यांनी दुरध्वनीवरूंन आ.अनिकेत तटकरे यांना दिली आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे नेतृत्व नक्कीच गावाचा शंभर टक्के सर्वांगीण विकास करतील अशाप्रकारचा आत्मविश्वास प्रदीप बामुगडे यांनी व्यक्त केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.