Press "Enter" to skip to content

माथेरान करांना ह्या वेळीतरी लॉक डाऊन मध्ये दिलासा मिळणार का ?

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मिशन ब्रेक द चेन सुरू करताना लॉक डाऊन ची घोषणा केली आहे त्यामुळे राज्यातील पर्यटन केंद्र बंद पडली आहेत ह्या काळामध्ये राज्य शासनाने अनेक जणांना दिलासा मिळाला ह्याकरिता अनेक योजना जाहीर केल्या आहेत पण त्याचा प्रत्यक्ष फायदा मात्र माथेरान करांना होणार नसून शासनाच्या उदासीनतेचा फटका येथील स्थानिकांना बसणार आहे राज्य शासनाने लॉक डाऊन जाहीर करण्याअगोदर अनेक गोष्टींचा विचार करून कष्टकरी व अनेकांना फायदा होईल अशा योजना जाहीर केल्या मा. मुख्यमंत्र्यांनी अनेकांचा विचार करताना लॉक डाऊन ची घोषणा करताना ह्या योजनाही जाहीर केल्या पण त्याचा प्रत्यक्ष फायदा किती जणांना होणार आहे.

शहरांमध्ये चौक कामगार ,रिक्षाचालक, शिवभोजन ह्या योजनांचा फायदा नागरिक घेऊ शकतात पण ग्रामीण भागातील लोकांसाठी त्याचा काय उपयोग , माथेरान पर्यटन नगरीचा विचार करता ह्यातील एकही योजनेचा फायदा येथील स्थानिकांना होणार नसून लॉक डाऊन जाहीर केल्याने नुकसानच झाले आहे येथील स्थानिकांचे प्रश्न वेगळे आहेत येथील कायदे वेगळे आहेत माथेरान हे ना शहरामध्ये मोडते ना ग्रामीण भागात मोडते त्यामुळे येथील स्थानिकांना कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही येथे जीवनावश्यक वस्तू मालवाहतुकीमुळे चढ्या दराने खरेदी कराव्या लागतात ज्यामध्ये जीवनावश्यक गॅस सुद्धा आहे.

प्रत्यक्ष किंमत कमी असताना येथील स्थानिकांना हा गॅस घरपोच 970 रुपयांना मिळत आहे ,पर्यटन व्यवसाय बंद असून ही येथील व्यावसायिकांना वीज व पाणी बिले व्यावसायिक दरानेच भरावी लागत आहेत ,पर्यंतनच बंद असल्याने कमाईचे साधन बंद आहे त्यामुळे येथील स्थानिकांना मोलमजुरी हाच एकमेव पर्याय उपलब्द आहे. शासनाकडून माथेरांकरांना मागील वर्षीही कोणतीच मदत भेटली न्हवती व ह्यावर्षी भेटणार नाही असेच येथील स्थानिकांचे म्हणणे आहे, शासनाचे सर्व कायदे लागू करताना येथे कोणतीच अडचण येत नाही पण ज्यावेळी येथील स्थानिक ज्या ज्या वेळी शासनाकडे सुविधांची मागणी करते त्यावेळी मात्र अनेक कायद्याच्या जाचक अटी नेमक्या समोर येतात ह्याचे मूर्तिमंत उदाहरण येथे गॅस टाकी पुरविण्यासाठी वाहन उपलब्द व्हावे ही मागणी कित्येक वर्षे धूळखात पडून असल्याचे आहे.

त्याच बरोबर वाहतूक सुविधा अधिक स्वस्त व जलद व्हावी म्हणून ई रिक्षाची मागणी कडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे माथेरान मधील नागरिक आजही पारतंत्र्यातच नाही ना असा सवाल करीत आहेत प्रत्येक वेळेला येथील नागरिकांना कोणत्याही मागण्यांसाठी मोठा संघर्ष करावा लागत असतो . पुन्हा एकदा लॉक डाऊन लागल्याने ह्यावेळी तरी शासनाच्या योजनांचा लाभ माथेरांकरांना मिळावा किव्हा एक दुर्गम भाग म्हणून विशेष योजनेतून माथेरान करांना दिलासा मिळाला ह्याकरिता माथेरान कर शासनाकडे मागणी करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.