सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपकदादा गणपत पाटील यांचा वाढदिवस राज्यभर कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्ले येथील निवासस्थानी परिसरातील आदिवासी बांधवांना कडधान्य व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.तर कानसा वारणा फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकार होंडा शोरुम शेंडगेवाडीत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ उपस्थित होते.शिवशाही प्रतिष्ठान कल्याण पूर्व प्लाझा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले.गणराज जैन यांच्या पाणवठा अपंग प्राण्यांच्या आश्रमात प्राण्यांना खाद्य देण्यात आले.20 किलो डाॅगफुड आणि 10 किलो कॅटफुड देण्यात आले.कोल्हापूर मातोश्री वृद्धाश्रमात आजी आजोबांना स्नेहभोजन देण्यात आले.तर राज्यातील विविध जिल्ह्यांत कानसा वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर राबवून कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले.



दरम्यान ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब कुटूंबाना हक्काचा आधार देणारे दिपक दादा गणपत पाटील यांचा वाढदिवस राज्यभर ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.कोरोना पाश्र्वभूमीवर दिपक पाटील यांनी गोरगरीब जनतेला जिवनावश्यक वस्तू वाटप करुन कानसा वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.कोरोना दुसऱ्या लाटेतही राज्यभर रक्तदान शिबीर राबविणार असल्याचे कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक दादा पाटील यांनी बोलताना सांगितले.








Be First to Comment