परीसरात 148 कोरोनारुग्ण !
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली.यातच तालुक्यात खोपोली नगरपालिका हद्दीत दुस-या कोरोना लाटेत कोरोनाचे रुग्ण संख्या मोठी असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्द दुसऱ्या स्थानावर आहे.
वासांबे मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख गेल्या पंधरा दिवसांपासून परीसरात वाढतच आहे.सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात 13 एप्रिलपर्यंत एकूण 148 रुग्ण अॅक्टीव असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 702 झाली आहे.यात कोरोनावर 554 जणांनी मात केली आहे.परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन होत आहे.
वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची 13 एप्रिलपर्यंत असलेली गावनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
मोहोपाडा –कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-27
रिस परिसर-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या -68
नविन पोसरी-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-7
चांभार्लीं-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या -12
शिवनगर-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-3
आली आंबिवली-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-3
लोधिवली परिसर-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-19
पानशिल-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-3
तळेगाव-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-3
रिसवाडी-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 01
तळेगाव वाडी-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 01
पराडे-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 01
दरम्यान 13 एप्रिलपर्यंत चौक मंडलात एकूण 1231 रुग्ण संख्या असून एकूण 44 जण मयत झाले आहेत.खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्गांचा आलेख मे मध्यंतरी दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.तरी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन कोरोनाला परिसरातून हद्दपार करावा.
सध्या 13 एप्रिलपर्यंत खालापूर तालुक्यात एकूण अॅक्टीव कोरोना रुग्ण संख्या 414 असून एकूण मयत 129 आहेत.एकूण कोरोनारुग्णसंख्या 3840 झाली आहे.शासनाने 45 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीकरण सुरु केले असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पालावे,मास्कचा वापर करावा असे आवाहन होत आहे.
जिल्ह्यात 12 एप्रिल पर्यंत एकूण 157928 लसीकरण झाले आहे.यात पहिली लस 142174 जणांनी घेतली तर दुसरी लस 15754 जणांनी घेतली आहे.कोरोना संसर्गांने मृत्युदर कमी असून यातील 85 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आढळतात.यात कॅन्सर, टिव्ही, मधुमेह,हायपर टेन्शन व अन्य आजारांमुळे मृत्यू रुग्णांमध्ये जास्त असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.








Be First to Comment