सिटी बेल । तळोजा । वचन गायकवाड ।
संपूण॔ भारत देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढत आहे. कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना सारख्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून मिनि लाॅकडाऊन, कडक विकेंड लाॅकडाऊन राबविण्यात येत आहेत. राज्य सरकारने राज्यात सर्वत्र शुक्रवारी राञी आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजता असा दोन दिवसांचा अर्थात तब्बल 60 तासांचा शनिवार व रविवार असे दोन दिवसाचा विंकेड लाॅकडाऊन जाहिर केला असून ब्रेक द चेन या अभियाना अंतर्गत राज्य सरकार, पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन विशेष पर्यत्न करताना दिसत आहेत.

तळोजा परिसरासह ग्रामीण भागात कोरोना वाढत चालला आहे. याच अनुषंशाने विशेष काळजी घेण्याच्या दूष्टीने तळोजा परिसरातील व तळोजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तसेच तळोजा औधोगिक विभागात, तसेच तळोजा परिसराला लागून असलेल्या पनवेल तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दितील शिरवली व वांवजे ग्रामिण विभागाता आज कडक दोन दिवसाचा तब्बल 60 तासांचा वीकेंड लाॅकडाऊन यशस्वी पणे पाळण्यात आला.
विशेष म्हणजे तळोजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील व ग्रामीण भागित विशेषता देविचापाडा, डोगरेपाडा, पालेखुद॔, पडघे, तोडरे, वावंजे, खेरणे, नितलस, नावडे, पेंधर, घोट,नागझरी, चिध्रण, शिरवली, मोहदर, कुत्तारपाडा , तळोजा, सिद्धी करवले, धानसर, या गावामध्ये 100% कडक वीकेंड लाॅकडाऊन पाळण्यात आला.

आज तळोजा औधोगिक परिसारतील वाहतुक सेवा सुद्धा थप्प होती. तळोजा परिसरातील रस्त्यावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच तळोजा परिसरातील तळोजा गावातील बाजार पेठ व देविच्यापाड्यातील मुख्य बाजार पेठ गेली दोन दिवस पूण॔ता बंद असल्याची पाहायला मिळाली. या परिसरातील स्थानिक नागरिकांनी व विशेषता परप्रांतियांना घरात राहून या लाॅकडाऊन मध्ये बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना मोलाचे सहकार्य केल्याचे दिसून आले.
तळोजा पोलिसांचा व ग्रामीण भागात तालुका पोलिसांचा कडक बंदोबस्त काही मोजक्याच ठिकाणी असताना सुद्धा अनेक गावात नागरिकांनी हा लाॅकडाऊन मुख्यमंञ्याचा आदेश व कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून इमानदारी पाळला अस काही नागरिकानी म्हटले आहे.

तळोजा पोलिसांकडून आय.जी.पी.एल. नाका, धानसर टोल नाका, तळोजा पेस 1 अशा तीन ठिकाणी नाकाबंदी असून एक टिम पनवेल महानगरपालिकेच्या सोबत कारवाई करत आहे. अशा एकूण चार टिम नेमण्यात आल्या आहेत असे तळोजा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक काशिनाथ चव्हाण यांनी म्हटल आहे.








Be First to Comment