Press "Enter" to skip to content

कालव्याची निगा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भावना जोपासावी

कोलाड पाटबंधारे विभागाचे आवाहन

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

साफसफाई करण्यात येत असलेल्या कालव्याची निगा राखण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्याची भावना जोपासण्याचे अवाहन कोलाड पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

सिंचन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेल्या कालव्याची साफसफाई व स्वच्छता तसेच झाडीझुडपे तोडणे आदी कामे वेगाने सुरू झाली आहेत. याबाबतची माहिती संबंधितांच्या वतीने पत्रकारांना देण्यात आली आहे.याबाबत माहिती देताना मागील ४० वर्षापूर्वी रोहे व माणगाव तालुक्यात शेती क्षेत्राचे विकासासाठी व शेतकरी वर्गाला सुगीचे दिवस येण्यासाठी सिंचन काळप्रकल्प रायगड विभाग यांच्या वतीने रोहे तालुक्यातील डोलवहाळ येथून वाहत असलेल्या कुंडलिका नदीवर बंधारा बांधून त्या बंधा-यातून डावा व उजवा तीर असे दोन कालवे काढून रोहे व माणगाव तालुक्यातील शेती क्षेत्राचे विकास तसेच घरगुती वापरासाठी पाणी पुरवठा करण्यात आला.

कालव्याच्या पाण्याचा शेतकरी वर्गाने चांगला फायदा घेत ऊन््हाळी हंगामात भातपिकाचे उत्पादन घेऊ लागले. पावसाळ्यात पावसाचे पाण्यावर तर ऊन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भात शेती पिकू लागल्याने शेतकरी वर्गही सणाधानी दिसू लागल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक चणचण ब-यापैकी दूर झाल्याचे समाधानकारक चित्र उभे राहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर सध्या कालव्याची सुरू असलेली साफसफाई व स्वच्छता याबाबतची अधिक माहिती देताना ४० वर्षापूर्वी खोदण्यात आलेल्या कालव्याची देखभाली व्यतिरिक्त मध्यंतर कधीही मोठी दुरूस्ती न केल्याने कालव्याचे बहुतांश पाणी ठिकठिकाणी वाया जात होते.

त्यातच खेकडे,उंदीर,घुशी यांचाही मोठा उपद्रव दिसून येत होता.त्यातच पावसाळ्यातील पाण्यामुळेही कालव्याचे मोठे नुकसान होत असल्याने वाया जाणारे पाणी वाचविणे काळाची गरज असल्याने मागील आठ-दहा वर्षापूर्वी कालव्याची दुरूस्तीचे व पक्के बांधकामाचे कामास प्रारंभ करण्यात आला.त्यामुळे कालव्याचे शेतीला आवश्यक असणारे पाणी बंद करण्यात आले. मधल्या काळात कालव्याचे बांधकाम व दुरुस्तीचे काम पुर्ण होऊनही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणीच बंद असल्याने कालव्याची साफसफाई करणे गरजेच असल्याने साफसफाई व स्वच्छता आदी कामे जोरदारपणे सुरू आहेत.तर थोड्याच दिवसात ती कामेही पुर्ण होऊन भविष्यात शेतकरी वर्गाचे मागणीनुसार शेतीसाठी पाण्याचीही व्यवस्था करण्यात येईल.परंतू साफसफाई करण्यात आलेला कालवा याची निगा राखणेसह कालव्यातील पाण्याची बचत करणे काळाची गरज असल्याने शेतकरी वर्ग व रहिवासी वर्गाने यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन करीत असतानाच पाणी ही बचत ही काळाची गरज आहे.

आज बचत केलेले पाणी भविष्यात आपण त्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करू शकतो.कालव्याची निगा राखून पाण्याची बचत करणे हे केवल शासनाचे हातात नसून आपल्या सर्वांचे सहकार्याने ते शक्य होणार असल्याचे शेवटी त्यांनी म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.