Press "Enter" to skip to content

पेण शहरातील लॉकडाऊन शिथील करा : प्रविण पाटील यांची मागणी

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासााठी सरकारने आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काही निर्बंध लागू केले आहे त्या अनुषंगाने पेण नगरपरिषदेने अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे मागील वर्षी लाॅकडाऊन मध्ये अधिच आर्थििक अडचणीत असणारे व्यापारी सामान्य नागरिक यांना जीवन जगणे कठीण झाले आहे त्यात पुन्हा या निर्बंधामुळे जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे तरी शहराातील लाॅकडाऊन शिथीलता आणावी अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, अशोक जैन यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्याकडे केली आहे.

तसेच सदर दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यात यावीत असेही या निवेदनात म्हटले आहे. याबाबत
शहरातील नागरिकांनी दिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवून त्याअनुषंगाने पेण शहरातील निर्बंध बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सांगितले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.