अदिवासींच्या उपजिविकेवर प्रश्न चिन्ह
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
रणरणत्या उन्हामध्ये वणवा लावण्यामध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला,माळरान आणी डोंगर भागामध्ये वणवा मोठ्या प्रमाणात लावले जात असून निसर्गातील असलेली वनसंपत्ती या मध्ये जळून खाक होत असल्याचे दुर्देवी चित्र सध्या तालुक्याच्या ठीकाणी पहावयास मिळत आहे.
एप्रिल महीन्यात जंगलातील रानमेवा तयार होत असतो,आणी या वरती आदिवासी बांधवांचे उपजिविकेचे साधन निर्माण होत असत या व्यवसायाला खिळ बसत आहे.यामुळे मुळे सर्व काही संपुष्टात येत असल्यांने पर्याप्रेमी समवेत आदिवासी मध्ये नाराजीचा सुर निघत आहे .
त्याच बरोबर मुक्त विहार करणार्या प्राणीमात्रांवर संकटाला सामोरे जाण्याची वेळ निर्माण झाली आहे. वणवा लागल्याने जंगलातील गवत जळून खाक होत आहे. पेरणीपुर्व राब जाळण्यासाठी लागणारे गवत मिळत नसल्याने शेतकर्यांत नैराश्यता दिसून येत आहे.तसेच जनावरांवर उपासमारीची वेळ येत असल्याची खंत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.
वणव्यात झाडे-झुडपे लहान रोपटे, पाला पाचोळा, वन औषधी जळून खाक होत असल्याने आदिवासी समाजाला रोजगार देणार्या वनसंपत्तीपासून वंचित रहावे लागत आहे. त्याचबरोबर पशू-पक्षी, सरपटणारे प्राणी, किड्या, मुंग्यांना सुरक्षित जागे अभावी वन्य प्राणी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे.वणव्यात प्राण्यांचे अन्न जळून खाक होत असल्याने पोटासाठी लोकवस्तीकडे येणार्या प्राण्यांना जीव गमावण्याची वेळ निर्माण झाली,असून वन्य प्राण्यांच्या सुरक्षित जागेचा प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे.








Be First to Comment