रक्त देऊन रक्ताची नाती जोडू या ! डॉक्टर मंगेश पाटील यांचे प्रतिपादन
सिटी बेल । मुरूड । अमुलकुमार जैन ।
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे.शासनाकडे फक्त सात दिवस पुरेल इतकाच रक्त पुरवठा आहे.त्यामुळे तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.रक्ताची नाती ज्याप्रमाणे आपण जपतो त्याप्रमाणे रक्त दान करून रक्ताची नाती जोडू या असे भावनिक आव्हान माजी वैद्यकीय अधिकारी व प्रख्यात डॉक्टर मंगेश पाटील यांनी केले आहे.
महादेव कोळी समाज मुरुड व श्रीयश हॉस्पिटल व शासकीय रक्त पेढी जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉक्टर मंगेश पाटील बोलत होते.सदरील कार्यक्रमाचे उदघाटन समाज अध्यक्ष मनोहर बैले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या प्रसंगी तहसीलदार गमन गावीत, उपाध्यक्ष मनोहर मकु,डॉक्टर दीपक गोसावी,सुरेंद्र मकु,डॉक्टर संजय पाटील,डॉक्टर इप्सित पाटील, समाजसेवक अरविंद गायकर,प्रकाश सरपाटील,महेंद्र पाटील,डॉक्टर आदित्य पाटील,चेतन मकु,गजानन पाटील, ऋत्विक मकु ,डॉक्टर सुहासिनी चव्हाण,नर्स रुपाली बळी, सुशील ठाकूर,प्रल्हाद गोंजी संदीप पांगे,जितेंद्र मकु आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर मंगेश पाटील म्हणाले कि, रक्त दान केल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो.यासारखे दुसरे समाधान मिळू शकत नाही.मुंबई हुन आल्यावर गावातील लोकांना २० वर्ष सेवा देत आहे.यात माझ्या समाजाचे मोठे योगदान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तहसीलदार गमन गावीत यांनी सांगितले कि, रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.रक्त दान शिबिराचे आयोजन उत्तमरीत्या केलेले आहे.मुरुड तालुक्यात जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.सदरील रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळून १५३ बॉटल रक्त संकलित करण्यात आले आहे.








Be First to Comment