Press "Enter" to skip to content

धाटाव औद्योगीक वसाहतीतिल पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

अवैध ट्रक पार्किंग कामगार वर्गासाठी डोकेदुखी, अपघातांचा धोका कायमच

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोहा तालुक्यात धाटाव औदयोगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत उभी असलेल्या अवजड वाहनांमुले अवैधपणे केलेली पार्किंग आता कामगार वर्गासह येथील स्थानिक नागरिक वर्गाला चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.त्यातच रस्त्यांच्या साईड पट्यांवर टाकलेली माती ही ट्रक टर्मिनल नसल्यामुळे उभ्या असलेल्या वाहनांमुळे अक्षरशः रस्त्यावर येऊन डांब्रिकरणाचे रस्ते आता धुळीचे झाले आहेत.त्यातच गेली कित्येक वर्षापासून अधांतरित राहिलेल्या ट्रक टर्मिनलच्या प्रश्र्नामुळे पार्कीगचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

अशाने अपघातांचा धोका मात्र कायम राहिल्याने याठिकाणी सतत रहदारी करणाऱ्या कामगार व स्थानिक नागरिक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
धाटाव औद्योगिक क्षेत्रात अनेक कामगार रोजंदारी साठी रात्री अपरात्री कारखान्यात कामावर येत असतात. परंतु अवजड वाहनांची पार्कींग तसेच रस्त्याच्या साईड पट्यांच्या अभावामुळे अपघातांचा धोका होऊ शकतो.अवजड वाहनांच्या बेधुंद पार्किंग मुले अनेक अपघात घडले आहेत तर काहींजन जागिच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मात्र या सर्व समस्यांना जबाबदार कोण?असा प्रश्न पुढे येत आहे.

१७ एप्रिल २०१८ रोजी मागील तीन वर्षांपूर्वी धाटाव औद्योगिक वसाहतीतिल सेफ्टी ऑडिट व ट्रक टर्मिनल बाबत पर्यायी जागेविषयी तत्कालीन खासदार अनंत गीते यांच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठकीचे आयोजन मुंबईतील सह्याद्री अतिथि गृहात करण्यात आले होते.या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडलाचे उपसंचालक सोनटक्के,श्री मलिकनेर,विकास मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश झंझाड,मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष नातिम, प्रवेशिक अधिकारी गोपीनाथ ठोम्बरे, रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी एस आर बर्गे, प्रदूषण नियंत्रण महामंडल प्रादेशिक अधिकारी डॉ. अ. ना.हर्षवर्धन यांसह शिवेसना जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई,संपर्क प्रमुख विलास चावरि, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे,रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांसह इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते.

मात्र आजवर या विषयी ठोस भूमिका न झाल्याने कामगार वर्गासह स्थानिकांनी या समस्येविषयी नाराजी वक्त करताना दिसत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.