सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू ।
देशात व राज्यात कोरोनाने पुन्हा हाहाःकार माजविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून काही ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे राज्यातील दवाखान्यात बेड शिल्लक नसल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत आहे.
उरणमध्ये ही कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जनतेनी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाहीतर भयानक परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येऊ शकते यासाठी प्रत्येकांनी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जागृत राहून नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचे संकट मानगुटीवर बसले ते उतरण्याचा नाव घेताना दिसत नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही दुसरी लाट पहिल्या कोरोनापेक्षा भयानक असल्याचे तज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरनाचा कोरोनाने हाहाःकार माजविण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी जनतेला लॉकडाऊनमुळे भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला होता. हा अनुभव पाठीशी असताना कोरोनाचे भय कमी झाले असल्याचे वाटत असतानाच कोरोनाच्या दुसर्या लाटेने शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा फटका जबरदस्त बसू लागला आहे.
कोरोना गेला अशी भावना जनतेची झाली असतानाच गेले काही महिने बंद असलेले सुरळीत सुरू झाल्यानंतर पुन्हा मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाःकार माजविण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी जशी कोरोना रुग्णांची परिस्थिती होती, त्यापेक्षा भयानक परिस्थितीचा सामना आता करण्याची वेळ रुग्णांवर व त्यांच्या नातेवाईकांवर आलेली आहे.
राज्यात आजच्या घडीला पहिल्या पेक्षा कोरोनाने बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पहावयास मिळते. यामुळे राज्यातील अनेक भागातील दवाखान्यात कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी बेड खाली नाही. यामध्ये धनधांडगे व ज्यांच्याकडे 40 ते 50 लाखांची मेडिक्लेम पॉलिसी आहे, अशांना कोरोनाची बाधा होऊनही दवाखान्यात दाखल करण्यासाठी मिनतवारी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तर सर्वसामान्य जनतेची परिस्थिती यापेक्षा भयानक असल्याचे बोलले जात आहे. कारण हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धच नाहीत.
राज्यात कोरोनाने पुन्हा हाहाःकार माजविला आहे. दिवसेंदिवस आकडा वाढत चालला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेत परिस्थिती अशीच राहिली तर पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे सूतोवाच केले आहे. यावरून राज्यात कोरोनाने हाहाःकार माजविला असल्याचे उघड होते. उरणमध्ये ही दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत चालला असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्यात तापाची साथ ही जोरात सुरू असतानाही अनेकजण दवाखान्यात उपचार करण्यास तयार नसल्याचे समजते. तसेच पूर्वी जशी प्रशासन यंत्रणा कार्यरत होती तशी यावेळी नसल्याचे दिसत आहे.
शासनाने कोरोना बाबत जी नियमावली बंधनकारक केली आहे. त्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसते. यामुळे उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे बोलले जात आहे.
उरणमध्ये ऑक्सिजन लेव्हल 90 पेक्षा कमी असणार्यांवर उपचार करण्यासाठी सोय नाही. अशा रुग्णांना उरण बाहेर नेण्याची परिस्थिती आली तर त्यांना दवाखान्यात बेड मिळण्याची 99 % शक्यता कमी दिसते. या सर्वांचा सारासार उरणकरांनी विचार करून शासन व प्रशासनाला दोषी ठरवत असताना आपण दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी करीत नसल्याने ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरणच्या जनतेने दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या शेजारी पाजारी व आजूबाजूला कोणी आजारी असेल त्यांना दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यास सांगावे अथवा प्रशासनाला याची माहिती देऊन सहकार्य करावे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.आपणच आपले अणि आपल्या कुटुंबाचे रक्षण आपल्याला स्वतःला स्वतःच निर्बंध घालून घेऊया अणि सर्वांचे जीव वाचवून लॉकडाऊन टाळू या!








Be First to Comment