सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला – महाविकास आघाडी
पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली भुमीका स्पष्ट : पाच वर्षे कोणताही वाढीव कर लावण्यास तिव्र विरोध !
पत्रकारांना सभागृहाबाहेर काढण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कृतीचा केला निषेध !
सिटी बेल । पनवेल ।
पनवेल महानगरपालिकेची प्रथम सार्वत्रिक निवडणूक २३ मे २०१७ साली झाली या निवडणुकीत महानगरपालिका हदीतील मतदार बंधू भगिनींनी भाजपच्या फसव्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी ७८ पैकी ५१ नगरसेवकांना निवडून देऊन २/३ बहुमत दिले. परंतु सताधारी भाजपने प.म.पा हद्दीतील मतदार बंधू – भगिनींचा प्रत्येक बाबतीत भ्रमनिरास केला आणी मालमत्ता कराच्या बाबतीत तर संपूर्ण विश्वासात केला असून आम्ही महाविकास आघाडीतर्फे याचा निषेध करतो तसेच वाढीव मालमत्ता कराला पुर्ण ताकदीने विरोध करू असे आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या पत्रकार परिषदेला आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पमपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, शेकाप पमपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गणेश कडू, काँग्रेस पमपा जिल्हाध्यक्ष आर सी घरत, शेकाप पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, नारायणशेठ घरत, सुदाम पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, गोपाळ भगत, शंभर म्हात्रे, डॉ सुरेखा मोहकर, प्रज्योती म्हात्रे, निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे आदी उपस्थित होते.
प.म.पाहद्दीतील मालमत्ता कराबाबत भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात पाच वर्षे कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर जनतेला भरावा लागणार नाही अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. व त्यांनीच दिलेल्या आश्वासनाला दि.१७ जानेवारी २०१९ ठराव ११८ अन्वये हरताळ फासला आहे. सत्ताधारी भाजपाने घेतलेल्या या ठरावाला महाविकास आधाडीच्या २७ नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. परंतु बुहुमताच्या जोरावर ४६ विरुद्ध २५ नगरसेवकांनी हा ठराव मंजूर करून घेतला.
आमदार बाळाराम पाटील

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेत मालमत्ता कराबाबत विरोध केलाचं परंतु मालमत्ता आकारणीच्या प्रथम कारवाईला सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जनतेत जाऊन भाजपाने लादलेल्या या जिझिया कारस विरोध केला व आम्ही जनतेसोबत आहोत अशी भूमिका घेतली. आघाडीच्या या भूमिकेला नागरिकांनीही उस्फूर्त पाठीबा दिला. कारण महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामपंचायती ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या व आघाडीच्या ताब्यात होत्या त्यावेळी कोणताही कर नागरिकांवर लादला गेला नव्हता.
बबनदादा पाटील,
शिवसेना जिल्हा सल्लागार
महाविकास आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे जनतेत मालमत्ता कराला जो प्रचंड विरोध झाला. त्यामुळे भाजपचे काही नगरसेवक व पदाधिकारी यांना सुद्धा मालमत्ता कराबाबत भाजप सत्ताधारी विरोधी भूमिका घ्यावी लागली. भाजप नगरसेवक व पदाधिकारी यांच्याही लक्षात आले की, जर या करास विरोध केला नाही तर येत्या निवडणुकीला जनतेसमोर मत मागायला जाता येणार नाही. एकीकडे महाविकास आधाडीची टॅक्स विरोधी भूमिका व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात केलेले आंदोलन याला जनतेचा मिळालेला प्रचंड पाठींबा आणि दुसरीकडे भाजपा नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी घेतलेले सत्ताधारी भाजपच्या विरोधातील भूमिका यामुळे भाजपच्या पुढार्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. आणि हम करे सो कायदा या भूमिकेत असलेले भाजपा पदाधिकाऱ्यांची घमेंड उतरली गेल्यामुळे नेहमीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न एप्रिल च्या विशेष सभेत हा विषय ठेवून करत आहेत.
सतीश पाटील, नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पमपा जिल्हाध्यक्ष

आधी कर लावण्याची भूमिका घ्यायची व विरोध झाल्यावर सदर कर थोड़ाफार कमी करण्याचा प्रयत्न करायचा अशा भाजपच्या दुटप्पी धोरणाला महाविकास आघाडीचा विरोध आहे. तरी महाविकास आघाडीची भूमिका नागरिकांना पाच वर्षे वाढीव कर लावू नये हीच स्पष्ट आहे.
आर सी घरत,
काँग्रेस पमपा जिल्हाध्यक्ष








Be First to Comment