Press "Enter" to skip to content

हमरापूर विभागाचा विकास अधिक जोमाने करणार : आमदार रविशेठ पाटील

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील हमरापूर विभागाच्या अंगणवाडी आणि नाट्यगृह सभागृहाच्या विकासा बरोबर येथील भागाचा अधिक जोमाने विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवीशेठ पाटील यांनी केले. यावेळी हमरापूर येथे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज सभागृह व अंगणवाडी यांचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ते पुढे बोलतांना म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसह या गावाकरीता आमदार फंड सुध्दा उपलब्ध करून घेणार आहे.कारण हमरापूर हा गाव माझा आहे आणि या गावासाठी आपण मागच्या काळात मंत्री असतांना एमएमआरडीए च्या माध्यमातून 50 लाखांचा निधी मंजूर केला होता मात्र काही विरोधकांनी मंजूर केलेल्या निधीच्या फाइल गायब केल्याने येथील गावाचा विकास होऊ शकला नाही मात्र पुन्हा आपणच याच गावाचा विकास करणार असल्याचे शेवटी आमदार रवीशेठ पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, हमरापूर सरपंच प्रदीप म्हात्रे, एन. एच. जांभळे, माजी सरपंच मोहन नाईक, सरपंच विजय पाटील, रावे सरपंच संध्या पाटील आदींसह गणपती कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावाच्या वतीने आमदार रवीशेठ पाटील यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.