Press "Enter" to skip to content

विचारधारा-३ “सुख”

विचारधारा-३ *सुख*

सुख हे समाधान मानण्यात असते हे जरी खरे; तर नवनवीन शोध लावणारे शास्त्रज्ञ झालेच नसते. म्हणजेच मानसिकतेसाठी पाहिले तर सुख हे समाधानात दडलेले असते.
सुखाचे विविध प्रकार – भौतिक सुख, पारलौकिक सुख, वैश्विक सुख, जागतिक सुख, सामाजिक सुख वगैरे.
या सुखाचा जोडीदार दुःख जे त्यामागोमाग फिरतच असते. या दुःखाशिवाय सुख अंगी लागत नाही. जसे कष्टाच्या, मेहनत करतानाच्या वेदना त्याचे सुफल रूप सुख देतात; अगदी तसेच…
आपण म्हणतो की हा मनुष्य किती सुखी आहे? पण त्यासाठी त्याने काय काय सहन करून घाम गाळला आहे, हे मात्र जाणून घेण्याची साधी तसदीदेखील घेतली जात नाही.
थोडक्यात सुख-समाधान, दुःख यांच्या झळा आपल्या मानसिकतेपर्यंत किती प्रमाणात पोहोचू द्यायच्या यावर सर्व काही अवलंबून असते.
आपल्या मानसिकतेवर याचा काहीच परिणाम होऊ न देणे यातूनच मग विरक्तीचे मळे फुलतात व आपल्या ठिकाणी खऱ्या शाश्वत आनंदाचा भाग्योदय होतो. म्हणून तर
चक्रवत् परिभ्रमतः सुखदुःखे, अपरिणामतोऽस्य तु मनसि ।
सुदृढाः, सफलाः ते भवन्ति, ये जनाः व्यवहरन्त्येवं जगति ॥

✍️ लेखिका ✍️
श्वेता जोशी, नवीन पनवेल

2 Comments

  1. Radhika Parastekar Radhika Parastekar April 1, 2021

    Khupach chan..👌👌👌

  2. Radhika Parastekar Radhika Parastekar April 1, 2021

    Sukh la lekh khupach chan aahe👌👌👌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.