Press "Enter" to skip to content

पाताळगंगा नदीवरील खालापूर सावरोली पुल झाले धोकादायक

दुरुस्तीच्या कामासाठी मार्ग बंद वाहतूकित बदल खोपोली पेण मार्गावर वाहतुकोंडी

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

मागी दोन वर्षांपासून सावरोली व खालापूर च्या मध्यभागी पाताळगंगा नदीवरील पुल एका बाजूला कमकुवत झाल्याने धोकादायक झाले आहे पूलाला खालच्या बाजूस दोन नंबरच्या खांब (मधला गाळा) मोठा भगदाड पडलेला असून त्याच्या कामकाजासाठी काम।पूर्ण होई पर्यत वाहतूक बंद केल्याने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून शिलफाटा मार्गे वळविण्यात आल्याने या मार्गावर वाहतूक वाढल्याने येथे वाहतूक कोंडी सुरू केली आहे.

मुंबई पुणे महामार्गाला जोड़नारा रस्ता जुन्या मार्गावरून महामार्गाला जोड रस्ता आहे खालापूर पेण मार्ग असून हा रस्ता हा नेहमीच वाहनांची वर्दळ असते या रस्त्यावर खालापूर व सावरोली गावांच्या मध्येभागातून पाताळगंगा नदी वाहत असल्याने या ठिकाणी ५० वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला आहे या पुलावरून महामार्गाकडे व कारखान्यानकडे जाण्यासाठी अवजड वाहनांची नेहमीच रेलकचेल असल्याने या पुलाचा दुसरा खांब कमकुवत झाल्याचे दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात लक्षात आले होते.

याबाबत एम एस आर डी ला लक्षात आणून दिल्याने त्याची तांत्रिक तपासणी करून पूल दुरुस्तीचा अहवाल समोर आल्याने मागील तीन महिन्यापासून एकेरी वाहतूक मार्ग करून कामकाज सुरू होते मात्र पूर्णत्वास नेण्यासाठी या पुलाचे काम सुरू केल्याने २७ मार्च रोजी येथील वाहतूक पूर्णपणे बंद करू सदरच्या वाहतूक वळविण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी वाहतूक अक्युमेंट डेव्हलपर्स कंपनी ने खालापूर फाटा येथे वाहतूक बंदचे बोर्ड लावून बॅरिकेट लावण्यात आले आहे.

त्यामुळे मुंबई बाजूकडून व ग्रामीण भागातील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्र चार वरून शिलफाटा मार्गे करण्यात आली आहे तर ग्रामीण भागातील व एक्सप्रेस वे वरील वाहतूक शिलफाटा मार्गे वळविण्यात आली आहे अशी माहिती कामकाज करणाऱ्या अक्युमेंट डेव्हलपर्स कंपनी च्या वतीने दिली आहे

खालापूर फाटा येथे रस्ता बॅरिकेट लावून पूर्ण बंद केले आहे तसेच पेन ला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून खालापूर फाटयावरुन खोपोली मार्गे केला आहे

पुलाचे काम जलद गतिने चालू आहे दिवस रात्र काम चालू आहे तरी देखील वाहन चालक नियमानचे उल्लंघन करीत आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी

महेंद्रकुमार पटेल, डेव्हलपर्स कंपनी सुपरवायझर

खालापूर सावरोली च्या मध्येभागी असणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीसाठी कामकाज सुरू केल्याने खालापूर ते खोपोली आणि खोपोली ते सावरोली इसांबा फाटा या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी सुरू झाली आहे पाच मिनिटांत अंतर पार करणारे मार्ग तास तास वेळ लागत आहे त्यामुळे या पुलाच्या कामकाजासाठी एकेरी वाहतूक नियोजन करून करायला हवे होते मात्र आता तरी शक्य तेव्हढ्या लवकर हे कामकाज पूर्ण करावे

अभिषेक दर्गे – सरचिटणीस वाहतूक मनसे सेना महाराष्ट्र राज्य

खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी तहसील कार्यालय सबरजिस्टर कार्यालय तलाठी कार्यालय यासह पोलीस ठाणे अन्य कामासाठी बँक व बाजारपेठ असल्याने ग्रामनी भागातील नागरिकांचे सतत वर्दळ असते त्यामुळे या पुलाच्या कामकाजासाठी मार्ग बंद करण्यात आल्याने खोपोली शिलफाटा मार्गे लांब चा रस्त्याने जावे लागणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खर्चिक मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे

नरेश नामदेव पाटील – सामाजिक कार्यकर्ते माजगांव आंबिवली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.