खासदार सुनील तटकरे यांना ग्रामस्थांनी दिले निवेदन
सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
कोकण प्रांतातून धावणाऱ्या कोकण रेल्वेला रोहे तालुक्यातील बाहे-देवकान्हे गावच्या हद्दीत थांबा मिळून रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी या विभागाकडून कोकणचे भाग्यविधाते कार्यसम्राट खा.सुनील तटकरे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
बाहे-देवकान्हे गावचे हद्दीत रेल्वे स्टेशन झाले तर त्याचा फायदा तळवली तर्फे अष्टमी, देवकान्हे, खांब व मालसई या ग्रा.पं.हद्दीतील १३ गावे,७ बौद्धवाडी व ७ आदिवासी वाड्यांतील सुमारे १२ हजार लोकवस्ती असलेल्या या विभागाला होईल.बाहे-देवकान्हे पासून कोलाड रेल्वे स्टेशन १५ किमी तर रोहे रेल्वे स्टेशन १० किमी अंतरावर असल्याने या विभागातील रहिवासी वर्गाला कोकण रेल्वेचा प्रवास काहीसा गैरसोईचा ठरत आहे.याशिवाय या विभागातील बरीचशी मंडळी आपल्या रोजीरोटीसाठी मुंबई, ठाणे,पुणे येथे वास्तव्यास असल्याने त्यांनाही या रेल्वे स्टेशनचा चांगला फायदा होणार असल्याने येथे रेल्वे स्टेशनची नितांत आवश्यकता असल्याचे रहिवासी वर्गाची मागणी आहे.
खा.सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी विभागीय नेते बाबूराव बामणे,रामचंद्र चितळकर, वसंत मरवडे, यहेंद्र पोटफोडे आदी प्रमुख नेत्यांसह विभागातील ग्रामस्थांनी खा.सुनील तटकरे यांना लेखन निवेदनाद्वारे सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यात आली. यावेळी खा.सुनील तटकरे यांनी याकामी शासनाकडे शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले आहे.








Be First to Comment