देवकान्हे पाठोपाठ मुठवली खु.येथील डोंगर वणव्याने होरपळला
सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यात जंगरभागात वणवे लावण्याची मालिका सुरूच असून देवकान्हे पाठोपाठ मुठवली खु.येथील जंगलही वणव्याच्या आगीच्या भक्ष्यस्थळी पडल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक व ग्रामस्थांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ता.२६ रोजी सायंकाळच्या सुमारास गावापासून हाकेच्या अंतरावर छोट्या स्वरूपात लागलेल्या वणव्याने सुमारे तासाबराने मोठा पेट घेतल्याने आगीचे मोठमोठे लोण दिसू लागल्याने ग्रामस्थही भयभीत झाले.लागलेला वणवा लोकवस्तीमध्ये येतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच अखेर वणवा विझवण्यात ग्रामस्थांना मोठे यश आल्याने मोठाच अनर्थ ठळला.मात्र या वणव्यात जंगलसंपत्तीची मात्र मोठी हानी झाली.
दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात जंगलभागात वणवे लावले जातात. जंगलभागात दळी भाग तयार करणे, सरपनासाठी वणवे लावले जातात. वणव्यांमुळे जंगलसंपत्तीची हानी होऊन पर्यावरणाचे संतूलन बिघडू लागले आहे. याशिवाय जंगलभागात वास्तव्यास असणाऱे पशू-पक्षी यांचेही अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.व्रुक्षारोपण व व्रुक्षसंवर्धासाठी शासन दरवर्षी लाखो करोडो रू.खर्च करीत आहेत. परंतू आहेत तीच वनसंपदा वाचविण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना अभाव असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत.आहे.
जंगलंभागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांवर कोणाचेही अंकूश नसल्याने वणवे लावले जात असल्याचे पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून बोलले जात आहे. जो पर्यंत वणवे लावणा-यांवर कडक शासन केले जात नाही. तोपर्यंत वणव्यांची मालिका ही सुरुच राहणार आहे.








Be First to Comment