सिटी बेल । गोवे -कोलाड । विश्वास निकम ।
प्रचंड लावण्यात आलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील आंबेवाडी डोंगर अक्षरश: या वणव्यात होरपळत आहे.तर सततच्या लावण्यात वणव्यामुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत असुन यामुळे पर्यावरण प्रमी तसेच नागरिकांचा जिव तुटत आहे तर हाकेच्या अंतरावर असलेल्या वनखात्याला मात्र काहीच वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थिती वरुन दिसुन येत आहे.
माणसाने स्वताच्या स्वार्थासाठी अनादिकालापासून वृक्षाची कत्तल केली आहे.सध्याच्या आधुनिकरणाच्या व तंत्रज्ञानाच्या जीवनात औद्योगिकरण व नागरीकरणाच्या नावाखाली जंगले भुईसफाट होतांना दिसत आहे.त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले आहे.त्यातच भरीत भर म्हणुन ठिकठिकाणी लावत जाणाऱ्या वणव्यामुळे यात अधिक भर पडत आहे.दरवर्षी मार्च महिना उजाडल्यावर वणवे लावण्याचे प्रमाण मोठे दिसुन येत आहे.वणवे लावल्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचा धाक नसल्याने त्यांचे फावत आहे.शिकार करणे,वृक्षतोड करणे,वनसंपदा मिळवणे,तसेच सरपणासाठी लागणारा लाकूडफाटा यामुळे वणवे लावले जात असले तरी हे कायद्याच्या चौकटीत बसत नसून सुद्धा वनखाते उदासीन दिसत असुन वणवे लावणाऱ्यावर कधीही कारवाई झाल्याचे दिसुन येत नाही.
गेली सात ते आठ वर्षांपासुन शिकार करणे व इतर कामासाठी डोंगरांना वणवे लावणे याचे प्रमाण वाढत असुन यामुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत आहे यामुळे निसर्ग ही दिवसेंदिवस आपले रूप बदलत असतांना दिसत असुन कधी चक्री वादळ तर वेळेवर येणारा पाऊस कोणतेही महिन्यात पडू लागल्याने हवेत गर्मीचे प्रमाण वाढत आहे हे असेच सुरु राहिले तर मानव जिवन ही धोक्यात येईल यामुळे वनखाते व संबंधित यांनी याकडे लक्ष देऊन वणवे लावणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रितम पाटील यांनी केली आहे
रोहा तालुक्यातील विपुल वनसंपदा लाभलेल्या मोजक्याच जंगलात कोलाड-आंबेवाडी जंगलाचा समावेश होत असुन हा डोंगर मुंबई -गोवा हायवे लगत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष सहज वेधून घेत आहे.त्यामुळे वनसंपदे बरोबर प्राण्यांच्या वास्तव्यावर गदा येत असुन वनखाते एवढे निद्रअवस्थेत दिसत आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे.








Be First to Comment