Press "Enter" to skip to content

अहंकाराची होळी..

अहंकाराची होळी..

आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही गुपीत दडलेले आहेत.. तुम्ही म्हणाल असे कसे ? अहो आता होळी सणाचेच बघा ना..! पौराणिक आख्यायिकेनुसार हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद भगवान श्री विष्णूचा परम भक्त होता.पण ते हिरण्यकशिपूला मान्य नव्हते.तो स्वतः ला खुप बलवान समजत. त्यामुळे तो प्रचंड अहंकारी होता.अहंकारापायी स्वतः च्या मुलाला मारण्यासाठी त्याने बहीण होलिकादेवी जिला अग्निवर विजय मिळवण्याचे वरदान मिळाले होते. तिने भावाच्या सांगण्यावरून प्रल्हादाला जवळ घेऊन समजावले, त्या दुष्ट आत्याच्या मनात आपल्याला मारायचा कट आखला जात आहे हे त्या निष्पाप जीवाला काय माहीत..! अग्निकुंडात होलिकाच्या मांडीवर बसवायचे ठरले त्याप्रमाणे न घाबरता प्रल्हाद भगवान विष्णूचे नामस्मरण करत असतांनाच विष्णूने होलिकेला भस्मसात केलेे व प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. तात्पर्य हेच कि आधी प्रत्येकाच्या मनात अनेक वर्षे धगधगणारी होळी शांत करावी. म्हणजेच असलेले अवगुण कमी करावे,म्हणजे वाईटातून चांगले निर्माण होईल.
या होळीच्या निमित्ताने चांगले विचार व सवयींना जवळ करून,वाईट गोष्टींचा नायनाट करायचा.म्हणुनच मनात असलेले वाईट विचार व कोणाविषयी मनात असणारे गैरसमज दूर करायचा हा दिवस..! खुप जुने नातेसंबंध व वाद असतील तर समोरासमोर बोलून जमा झालेली किल्मिश कायमची दूर करायची, म्हणजेच होळीत दहन करायची नात्यात नवीन रंग भरुन ( रंग खेळून) नव्याने सुरुवात करायची. म्हणूनच नावडत्या लोकांबद्दल हक्काने बोंबलायचा दिवस म्हणून अजूनही खेडोपाडी जुन्या रुढी परंपरा पाळणारे व बोंब मारणारे पण आहेत बरं.! पण मला वाटते की बऱ्याच ठिकाणी.होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. तसे न करता यावर्षी पासून आपल्या आतल्या वाईट सवयींचा नायनाट करून चांगल्या गोष्टी अंगिकारणे म्हणजेच राग, द्वेष,मत्सर, अहंकार, घृणा या सगळ्या वाईट सवयीं होळी समजून जाळून टाकल्या तर झाडांना जीवनदान मिळेल व खऱ्या अर्थाने मन पवित्र होईल व आत्मिक समाधान मिळेल..आणि मग त्या मनातील होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा..म्हणजेच पुरणपोळीवर साजूक तुपाची धार सोडायची आणि मस्त तोंड गोड करायचे व तृप्तीचा ढेकर द्यायचा तात्पर्य हेच कि डोक्यात जमा झालेल्या वाईट गोष्टींची होळी केल्यानंतर मनावरचा ताण कमी होवून शांत झोप लागेल.. काय म्हणताय.
पण मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा आलेल्या करोनासंकटाला दूर करण्यासाठी त्याचा नायनाट करायचा असेल तर हा सण साधेपणाने करावा लागेल..चला तर मग आपल्यामध्ये असलेले राग, द्वेष, घृणा, मत्सर अहंकार याची होळी करून आपुलकिचे, प्रेमाचे नाते दृढ करु या..!!

सौ.मानसी जोशी, खांदा कॉलनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.