चिंता मिटली : पेण तालुक्यातील धोंडपाडा, तरणखोप व कोप्रोली गावांची क्षारयुक्त व अशुद्ध पाण्यापासून मुक्तता, आता पिण्यासाठी मिळणार शुद्ध व मुबलक पाणी
सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील धोंडपाडा, तरणखोप व कोप्रोली या गावात मागील कित्येक वर्षे भूमिगत जलसाठ्यात क्षारयुक्त प्रमाण अधिक होते, येथील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असे, परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता, ही गरज ओळखून येथील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी
एस जी एस ग्रुप व सोहम फाउंडेशन यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. एस जी एस कंपनीच्या सीएस आर उपक्रमातून याठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे.

त्यामुळे येथील ग्रामस्तांना शुद्ध पाणी उपलब्द होणार आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्द होणार असल्याने नागरिकांचे आरोग्य सुधारून जीवनमान उंचावेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.सदर जलशुद्धीकरण यंत्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्तांकडून शुल्क आकारले जाणार आहे, त्यातून सदरची यंत्रणा सातत्यपूर्ण चालावी, दीर्घकाळ टिकावी यासाठी ग्रामस्त आवश्यक ती खबरदारी घेणार आहेत.








Be First to Comment