Press "Enter" to skip to content

रोहा उडदवणे गावातील ऐतिहासिक चिरबाव ची बा रायगड करणार स्वच्छता

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

शिवकालीन गडकिल्ले लेणी ऐतिहासिक विहीर तसेच विविध ऐतिहासिक वास्तू शोध मोहीम बा रायगड परिवार टीम च्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येतात याच पार्श्वभूमीवर काळभैरव क्रीडा मंडळ,उडदवणे यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा उडदवणे येथील ऐतिहासिक बारव स्वच्छता अभियान मोहीम रविवार दिनांक : २८ मार्च २०२१ उडदवणे ता. रोहा, जिल्हा रायगड येथे आयोजित केली असल्याची माहिती मनोज थिटे यांनी दिली

रोहा उदडवणे गावाजवळ असलेली शिवकाळातील ऐतिहासिक बारव (विहीर ) काळाच्या ओघात नष्ट होत आहे त्यामुळे तिचे संगोपन होण्यासाठी संवर्धन करावी लागत आहे या करिता अनेकांना आव्हान करत पूर्वी महाराष्ट्रातील चौल बंदर हा व्यापारासाठी मुख्य बंदर होता.मोठ्या जहाजातून माल या बंदरात उतरत होता, मग छोट्या नावेत कुंडलिका नदीतून अष्टमी बंदरात येत असे कोकणातून देशात जाण्यासाठी सुधागड जवळील सवाष्णी आणि वाघजाई घाट हे दोन घाट अष्टमी जवळचे आणि उपयुक्त होते, मध्ययुगातील या व्यापारी मार्गात रोहा उडदवणे हा मुख्य गाव येत होता, याचा पुरावा म्हणून या गावात पूर्वेला एका बाजूने उतरता येईल अशी पायऱ्या असलेली विहीर आहे. या विहिरीला चिरबाव असे म्हणतात. या विहिरीच्या एका बाजूला एक आठ ते नऊ ओळींचा देवनागरी भाषेतील उठावदार शब्दात कोरलेला शिलालेख आहे. आता या शिलालेखाची झीज झाल्याने नीटसा वाचता येत नाही, सदरील या विहिरीचा आणि उडदवणे गावाचा इतिहास उलगडण्यासाठी काही तज्ञ मंडळींकडे या शिलालेखाचे छायाचित्र पाठवले आहे.. या विहिरीचा काही भाग कोसळलेला आहे. गडकिल्ल्यांबरोबर अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन होणे गरजेचे असल्याने बा रायगड परिवार आणि कालभैरव क्रीडा मंडळ उडदवणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वछता मोहीम हाती घेतली यासाठी गावातील शिवभक्त येथे लवकरच संवर्धन मोहीम हाती घेणार असल्याचे सांगीतले आहे .

सदरील विहीर (चिरबाव) ही उडदवणे गावातील महादेव माळी यांच्या मालकीची आहे.परंतु जतन_ ऐतिहासिक_ वास्तूंचे याकरिता बा रायगड परिवार सातत्याने शिवकालीन ऐतिहासिक वास्तूंची विविध स्तरांवर स्वछता करून त्याचे पावित्र्य जोपासण्याचे कार्य करते

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क :मनोज थिटे ८७९३२५८५३२मोरेश्वर माळी : ७८२०८०५०९३
दिगंबर कांबळे : ८९८३५१२६७० भरत महाडिक : ९०२९७६७४७६ नितेश कोल्हटकर : ७२७६६०७६९५ शिवभक्तांनी वरील क्रमांकावर संपर्क साधून सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे .

बारव म्हणजे काय ? हा प्रश्न अनेकांना बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. बारवात पाण्याचे अंतर्गत स्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडवणे ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत, पण पाऊस पडलाच नाही तर काय होईल ? पण बारव बद्दल अस नाही आहे भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या बारवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.म्हणूनच बारवांची स्वच्छता राखणे, त्यातील गाळ काढून अंतर्गत स्रोतांचा मार्ग मोकळा करणे, बारवांची बांधकामा वरून झाड झुडपे वेली काढुन टाकणे. व बांधकाम संरक्षित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

अशीच एक रोहा तालुक्यामधील उडदवणे गावातील बारव पुन्हा मोकळा श्वास घेण्यासाठी आतूर आहे. तिला पडझडीच्या स्तिथीतून बाहेर काढण्यासाठी तेथील कालभैरव क्रीडा मंडळ यांच्या साथीने खांद्याला खांदा देऊन आपल्याला ही बारव लवकरात लवकर मोकळीक करून तिला तीच गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे. दिनांक २८ मार्च २०२१ रोजी बा रायगड परिवार महाराष्ट्र रायगड विभाग व श्री काळभैरव क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आले असल्याचे शेवटी म्हटले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.