Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन …

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण

सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात दिल्लीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 120 दिवस पूर्ण होत आहेत . या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी रायगड जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुका पातळीवर आंदोलन करण्यात आले .

अलिबाग येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले . यावेळी भाजप हटाव , देश बचाव , मोदी हटाव , शेतकरी बचाव असे फलक झळकावत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.