सिटी बेल । उरण । करण ठाकूर ।
पाणी हे जीवन आहे पाणी हे नवसंजीवनी चे जणू काही रूप आहे या धरणीवर पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाण्याविना या भूतलावर जीवन ही कल्पना करू शकत नाही. जागतिक जल दिवसाचे महत्व ओळखून खरी गरज ही पाण्याची प्राण्यांच्या सोबत वनस्पतीना सुद्धा आहे.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून सुयश क्लासेस आवरे तर्फे मर्दनगड परिसतील वृक्षांना पाणी देण्याचे पवित्र कार्य करण्यात आले. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे पाणी दिलं जात. उद्देश फक्त एकच ही वसुंधरा वृक्षांनी बहरली पाहिजे. या वसुंधरा वृक्ष संख्या ही वाढली तर् पर्यवरणीय प्रदूषण आपोआपच कमी होईल आणि वृक्ष हे तरु होय सदर प्रसंगी सुयश क्लासेस चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर व आवरे गावातील गोड गेल्याचे क्रिकेट समालोचक संकेत गावंड हे उपस्थित होते.








Be First to Comment