Press "Enter" to skip to content

वडखळ,शहाबाज येथील अदानी प्रस्तावित सिमेंट जेट्टी ला शेतकऱ्यांचा विरोध

शुक्रवारी होणारी जनसुनावणी जनतेनी उधळून लावावी – माजी सभापती संजय जांभळे

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

वडखळ व शहाबाज परिसरात प्रस्तावित अदानी कंपनीच्या सिमेंट जेट्टी प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व मच्छीमार यांचा तीव्र आहे. या प्रकल्पा बाबत शुक्रवारी ( ता.26 ) शहाबाज , अलिबाग येथे होणारी जनसुनावणी जनतेनी उधळून लावावी असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे .

अदानी कंपनीच्या प्रस्तावित सिमेंट कंपनीच्या जेट्टी करता धरमतर खाडी किनारील पेण तालुक्यातील वावे, वडखळ , डोलवी, गडब तसेच अलिबाग तालुक्यातील शहाबाज,धामण पाडा,या साठी जमीन संपादन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

या बाबत शेतकऱ्यांना संभ्रमित करून शासना मार्फत जमीन संपादन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संजय जांभळे यांनी यावेळी सांगितले.शासन जमीन खरेदी करणार की अदानी समूहाला जागा देणार आहे ही शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे जांभळे यांनी म्हटले आहे.पेण व अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायती या प्रकल्पाला कोणतीही परवानगी देणार नाहीत असे स्पष्ट करतानाच कोरोना काळात सर्वत्र आचारसंहिता असताना जनसुनावणी कसली घेता असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

धरम तर खाडी किनारी असलेल्या जे.एस. डब्ल्यू. स्टील कंपनी तसेच कोळसा वाहतुकीमुळे,प्रदूषणामुळे पेण व अलिबाग तालुक्यातील शेतकरी व मच्छीमार व सर्वसामान्य जनता अगोदरच त्रासलेली आहे या नवीन सिमेंट प्रकल्पामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे असे संजय जांभळे यांनी सांगितले.या प्रकल्पासाठी मोठं मोठी मालवाहू जहाजे ये जा करणार असल्यामुळे मच्छीमार बांधव तर पूर्णपणे उध्वस्त होणार आहे.या प्रस्तावित जेट्टी साठी कांदळवन तोडली जात आहेत त्याकडे देखील शासनाचे दुर्लक्ष होत आहे कांदळवन तोडी मुळे किनाऱ्याची धूप होऊन खांडी जाण्याचे प्रमाण वाढून भातशेती मध्ये खारे पाणी जाऊन भात शेती नापीक होणार आहे त्यामुळे अदानी कंपनी च्या प्रस्तावित जेट्टी साठी साठी शुक्रवारी शहाबाज येथे होणारी जनसुनावणी जनतेनी उधळून लावावी असे आवाहन माजी सभापती संजय जांभळे केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.