Press "Enter" to skip to content

विनामास्क फिरणाऱ्यावर कर्जत नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरी नागरिक बाजार पेठेत विना मास्क फिरत आहेत अश्यावर कर्जत नगरपरिषद दंडात्मक कारवाई करत आहे.

कर्जत हे तालुक्याचे ठिकाण आहे त्यामुळे कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषद विना मास्क फिरणाऱ्या 16 जणांवर काल दि.22 मार्च रोजी तर आज दि.23 मार्च रोजी 13 जणांवर अश्या एकूण 29 जणांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे

कर्जत बाजारपेठेत मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील स्वतः तसेच कार्यालयीन अधीक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, सुदाम म्हसे,अशोक भालेराव, सुरेश खैरे तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वसंत वराडे, पोलीस नाईक अशोक राठोड, पोलीस नाईक किरण शेळके, महिला पोलीस कर्मचारी प्रीतम देशमुख, पूनम ढोमे, जया खंडागळे आदीनी ही करवाई केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, शासनाने नियम ठरवून दिले आहेत त्याचे पालन न करता विना मास्क फिरणाऱ्यावर वर्षभराच्या कालावधीत 280 जणांवर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करून सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.