सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
राजपुरी कोळीवाड्यात हरिदास बाणकोटकर हे आपल्या कुटुंबासह राहत आहेत.त्यांनी काही दिवसापूर्वी विटांचे पक्के बांधकाम केले होते त्यावर राजपुरी येथील महालक्ष्मी मच्छिमार सोसायटीने दावा केला होता कि, बाणकोटकर यांनी बांधलेले घर हे मच्छिमार सोसायटीने मासळी सुकवण्याच्या ओट्यावर असून ते बांधकाम तातडीने तोडण्यासाठी त्यांनी मुरुड तहसीलदार येथे अर्ज दाखल केला होता.पोलीस संरक्षण घेऊन बाणकोटकर यांचे बांधकाम तोडण्यात आले होते.
हरिदास बाणकोटकर यांनी याबाबत आपली कैफियत मांडताना सांगितले आहे कि,राजपुरी कोळीवाड्यातील संपूर्ण परिसर हा गावठाण जमीन आहे.कोळीवाड्यातील कोणत्याही व्यक्तीचा स्वतंत्र सात बारा नाही.माझे घर हे स .न १८/ २ मजीद व कब्रस्तान मधील जागेत असून सदरची जमीन सुद्धा गावठाण आहे.मी ज्या घरात राहतो ती जागा वरील क्षेत्रात असून माझ्या जागेशी मच्छिमार सोसायटीचा कोणताही संबंध नाही.परंतु येथील कोळीवाड्यात राहणाऱ्या काही लोकांनी डोंगराचे पाणी ज्या गटारातून वाहत येते त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे.घराचे बांधकाम करताना कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही.
तहसीलदार मुरुड यांनी माझे बांधकाम ज्या प्रमाणे तोडले त्याच प्रमाणे मी तहसीलदार मुरुड यांच्याकडे शासनाची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण करून कृष्णा गीदी ,नारायण चव्हाण, पदमु केशव आंबटकर,कृष्णा चव्हाण , धंनजय गीदि , हिरकणी गीदि,दीनानाथ आंबटकर आदी सह काही लोकांनी घरे बांधून तिथे राहत आहेत.जर तहसीलदार यांनी माझे घर पाडले तर यांचे सुद्धा घरे अतिक्रमण केलेली असून ती तातडीने पाडण्यात यावी अन्यथा मुरुड तहसील कार्यालयासमोर आपण आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे मुरुड तहसीलदार याना देण्यात आला आहे.
यावेळी उप विभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली मुरुड तहसील कार्यालयात सभा संपन्न होऊन त्यांनी सुद्धा वरील अतिक्रमण केलेली बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश मुरुड तहसीलदार याना दिले आहेत.मुरुड तहसील कार्यालयाकडून वरील सर्वांचे रीतसर पंचनामे मंडळ अधिकारी विजय म्हापुस्कर यांनी केले असून लवकरच अहवाल तहसीलदार याना सादर होणार असून तद्नंतर कार्यवाही होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.







Be First to Comment