लवकरच शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होण्याची चिन्हे
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील उजवातीर व डावातीर कालवा कोलाड पाटबंधारे विभागाकडून सफाई कामाची जलदगती असल्याचे दिसून येत असल्याने माळ रान झालेले कालवे आता पाणीमय होन्याची चिन्ह दिसून येत असल्याचे सर्वस्तरांतून बोलले जात आहे .
गेली अनेक वर्षे पाण्याअभावी असलेला झाडे झुडपं माती घनकचऱ्याने भरलेला या काळव्यामुळे येथील शेतकरी गेली अनेक वर्षे चिंताग्रस्त झाले आहेत त्यामुळे ईडा पीड़ा टळो बळीचे राज्य येवो हि म्हण आता भात कोठार म्हणून इतिहासात जमा झालेल्या रायगडातुन हद्दपार झाल्याची चिंता शेतकऱ्यांच्या नजरेतून दिसत होती परंतु पाटबंधारे खात्याला उशीरा कि ना होईना या बाबत जाग आली आणि जलसंपदा खात्याच्या वतीने या कालव्यांची साफसफाई व उर्वरित कामांना गती देत कालव्यांची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शेतीला सोडाच मानवी स्वच्छता गुंरढोराना मागील आठ ते नऊ वर्षा पासून कोलाड़ पाठबंधारे अभूत पूर्व पुई पुगांव खांब वगळता उजवातीर नडवली,तळवली, चिल्हे, देवकान्हे, उडदवने, मालसाई ,धामणसई, निडी, अष्टमी, तसेच डावातीर आंबेवाड़ी, संभे, किल्ला, धाटाव, वाशी, लांढर, निवी, भूवनेश्वर, आशा गावांना पाणी दिले गेले न्हवते मानवी जीवनाचे सोडाच मात्र गुरे ढोरे पशु प्राणी यांना गाव व गोटा शेजारी असलेला कळवा निकामी असल्याने पाण्याअभावी पशु प्राण्यांना वन वन फिरावे लागत होते पाणी टंचाईमुळे दरवर्षी परिसरातील तीन चार गुरांची पाण्याअभावी जीवित हानी होत असे मात्र सध्या सुरू असलेल्या पाठबंधाऱ्या खात्याच्या कामांची जलदगती पाहून लवकरच मानवी जीवनाला व पशु प्राणी गुरे ढोरे यांना पाणी मिळण्याचे संकेत मिळत आहेत ,
कोलाड पाटबंधारे विभाग डोळवहाल सिंचनातून या कालव्याना पाणी सोडण्याचे काम करतात परंतु सन २०१२/१३ या कालावधीत जलसंपदा खात्याने हे कालवे दुरुस्ती व काँक्रीटीकरनासाठी घेतले लाखो करोडो रुपये यावर पाण्यासारखे पाठबंधारे विभागाने खर्च केले मात्र कोणतेही काम पूर्ण करता आले नाही मात्र कालवे होते ते न्हवते झाले गेली सात आठ वर्षे येथील कालव्याला पाणी नसल्याने शेतकरी रब्बी हंगाम भात शेतीचा पीक घेऊ शकत नाही त्यामुळे गेली अनेक वर्षे त्यामुळे हजारो हेक्टरवर भात पीक घेणारे शेतकऱ्याना त्याचा मोठा नुकसान सहन करावा लागत आहे,
डोळवहाल सिंचनातून तातकालीन केवळ शेतकऱ्यांसाठी जलसंपदा खात्याने या कालव्याची निर्मिती केली मात्र हे पाणी आता शेतकरी कष्टकऱ्याना तर सोडाच मात्र त्यांच्या गुरेढोरे पशु प्राण्यांना देखील मिळत नसल्याने चिंतेची बाब बनली होती त्यातच गावागावातील विहिरींनी तळ गाठला गावात नळपाणी योजनेचे पाणी केवळ एकवेळ दिले जाते येथील कुंडलिकेच्या तीरावर वसलेल्या लोकवस्तीच्या मानवी जीवनाला पुरेसा पाण्याचा वापर करतात येत नाही पाण्याअभावी गुरांना ओला चारा नसल्याने सुका चारा खाऊन आपली भूक भागवतात मात्र पाण्यासाठी त्यांना शोध मोहीम काढत वणवण भटकावे लागते ही बाब अनेकदा वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आणून दिली गेली तरी देखील खाते डोळेझाक करत असतात परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी वर्गाने याचा जलदगतीने पाठपुरावा करत याचे युद्ध पातळीवर सफाईचे व दुरुसाठीचे हाती घेतलेले काम लवकरच पूर्ण करून पाणी मिळेल असे बोलले जात आहे.
प्रति वर्ष सहालाबाद प्रमाणे येथील शेतकरी वर्ग कोलाड पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्यासाठी मागणी करतात ही मागणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पाण्याची मागणी करतात मात्र कोलाड पाटबंधारे विभागाचे संबधित अधिकारी वर्गाचे प्रतिउत्तर की कालव्याची सफाई सुरू करून पाणी सोडण्यात येईल मात्र आजतागत त्याची सफाई झालीच नाही अथवा पाणी देखील नाही केवळ शेकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे खाते करत केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत होते सिंचनाचा पाणी शेतकऱ्यांना व त्यांच्या गुरांना नाही मात्र उद्योग धंदे व्यवसायिक तसेच वीज निर्मिती करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो मात्र शेतकरी व त्यांच्या गुरांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत होते मात्र आता सफाईचे कामांचे जोश पाहून समाधानकारक पाणी मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे ,
गेली आठ ते नऊ वर्ष चिल्हे देवकान्हे,मालसई धामणसई या विभागातील शेतकऱ्यांना कोलाड पाठबंधारे विभाग पाणी देत नाही कालव्याची सफाई करत नाही कळवा दुरुस्तीचे काम गेली सात आठ वर्षांपासून करोडो रुपये खर्च करून त्याचे काम देखील अर्धवट आहे सिंचनाचे पाणी मोठं मोठ्या उद्योग व्यवसाईकांना देतात मात्र शेतकऱ्यांना देण्यास सबधितांची टाळाटाळ होत होती आज उन्हाळ्याचे दिवस आहे गावशेजारील विहिरींनी तळ गाठला आहे गुरांना पाण्याची अति आवशक्यता आहे रोहा तालुक्याला एक खासदार तीन आमदार व एक पालकमंत्री लाभले असून कोणाचे ही लक्ष या गंभीर गोष्टींकडे नाही येथील शेतकरी गेली सात आठ वर्षांपासून कालव्याच्या पाण्यापासून वंचीत आहे सुदैवाने आता पाठबंधारे विभागाने कालव्याच्या सफाईची व पोट कालव्याचे गेट दुरुस्थिची दाखवलेली जलदगती ही अशीच दाखवत लवकरात लवकर पूर्ण करून दाखवली पाहिजे तसेच पाणी दिले पाहिजे
शेतकरी – गजानन गायकर








Be First to Comment