Press "Enter" to skip to content

पंचायत समितीच्यावतीने तरुणांसाठी रोजगार उपलब्ध कार्यशाळा

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना दीन दयाळ योजने अंतर्गत मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन स्वतःच्या विकासा बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करा,असे आवाहन उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी केले.

दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे.केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे. खालापूर पंचायत समिती,तालुका अभियान कक्ष(उमेद) व एड्युलाईट लर्निंग सर्विस प्रा. लि. च्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तीन महिने मोफत प्रशीक्षण,मार्गदर्शन देण्यात येणार असून पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

त्यावेळी उपसभापती बोलत होते.चार महिन्याचे मोफत निवासी प्रशिक्षण, नोकरी व व्यवसाय ची संधी, मोफत गणवेष व अभ्यास साहित्य,शासन प्रमाणपत्र, रहाण्याची व जेवणाची व्यवस्था, मुंबई, ठाणे परिसरात नोकरीची संधी, अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. सभापती वृषाली पाटील,सदस्य कांचन पारंगे,गट विकास अधिकारी संजय भोये,विस्तार अधिकारी शैलेश तांडेल, व्यवस्थापक उज्वला जगताप,शिवशंकर चिलगर तर एड्यूलाईट चे अक्रमसर व बिराजदार यांनी अभियानाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.२३ मुलगे व १८ मुलींनी नाव नोंदणी केली,हे सर्व कार्यशाळे उपस्थित होते.तालुक्यातील युवक-युवती यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समिती मार्फत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.