धूतूम ग्रामस्थांची वाढीव गावठाणाची मागणी : गाव विस्थापीत होण्याच्या मार्गावर
सिडकोच्या लाॅजेस्टीक पार्क मूळे ग्रामस्थांची घरे,व्यावसाईक गाळे, कब्जा वहीवाटी धोक्यात
सिटी बेल लाइव्ह । उरण । पृथ्वीराज कडू ।
नियोजीत सिडको लाॅजेस्टीक पार्क विरोधात 8 गावांनी सिडको विरोधात एकत्रीत विरोध दर्शवीला आहे.या लाॅजीस्टीक पार्क मूळे या आठ गावांतील गावठाण विस्ताराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामूळे धूतूम ग्रामपंचायतीने या लढ्यासोबतच सिडको विरोधात कायदेशीर लढा उभारला आहे.त्याच बरोबर गावाला गावठाण वाढ मिळावी म्हणून त्यांनी मुख्य मंत्र्यांसोबतच शासनाच्या प्रत्येक जबाबदार आधीकार्यांना पत्रव्यवहार केला आहे.आशी माहीती धुतूम गावच्या सरपंच रेश्मा ठाकूर यांनी दिली.
सिडको महामंडळाच्या नवी मुंबई प्रकल्पाआंतर्गत येणार्या मौजे जासई,मौजे चिर्ले,मौजे बैलोंडेखार,मौजे कौली बैलोंडेखार,मौजे धुतूम,मौजे पौडखार,मौजे जांभूळपाडा या उरण तालुक्यातील 8 गावांतील जमीनी सिडको महामंडळ लाॅजिस्टिक पार्क विकसीत करण्यासाठी संपादित करण्याची नोटीस काढली आहे. परंतू सर्व गावांतील नागरीकांनी या जमीनी संपादीत करण्यास विरोध दर्शवीला आहे.
परंतू या पेपर नोटीसीनुसार खरा प्रश्न उद्भवला आहे तो गावठाणाचा.येथील गावठाणांची कागदोपत्री वाढ कित्येक वर्ष झाली नसून लोकसंख्या वाढीमूळे प्रत्यक्ष गावठाण वाढ मात्र झाली आहे.त्या मूळे या नोटीसीने सरळ सरळ गावांतील घरांनाच हात घातला आहे.त्यामूळे ही गावच विस्तापीत होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामूळे धूतूम ग्रामपंचायतीने या विरुद्ध कायदेशीर प्रक्रीयेला सुरूवात केली आहे.

यासाठी त्यांनी प्रथम आपल्या गावाचा भूमीआभिलेख कडून सर्वे करून घेतला व सध्य परीस्थीतीत वाढ झालेल्या गावाचा नकाशा तयार केला.तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले.त्यांचा आधीकृत गावठाण हा फक्त 2 एकर आसून विस्तारीत गावठाण हा 60 एकर आहे. त्यामूळे 58 एकर मधील ईतर बांधकामे,त्या मध्ये निवासी घर,व्यावसाईक गाळे,शाळा,ग्रामपंचायत कार्यालय अशा अनेक बाबी आल्या. त्यामूळे धुतूम ग्रामस्थांनी हा कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे.
का आहे विरोध ?
1) मौजे धुतूम येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वे कडील नोटीसी मधील सर्वे नं.मध्ये ग्रामस्थांची घरे,व्यावसाईक गाळे,व नावे कब्जा वहीवाट आहे.त्यांना बाधा पोहचेल त्यातून गावच वीस्थापीत होईल
2) मूळ गावठाण व विकसतीत गावठाण म्हणून शासनाकडे आमची मागणी प्रस्तावीत आहे
3) सिडकोने यापूर्वी आमच्या जमिनी घेतल्या आहेत त्या तशाच अविकसित ठेवल्या आहेत
4) जेएनपिटी साठी झालेल्या भूसंपादनाचे पुनर्वसन शेतकर्यांना मिळाले नाही.
5) नवी मुंबईसाठी विकासासाठी झालेल्या भूसंपादन साडे बावीस टक्के पुनर्वसन अपूर्ण आहे
6) न्हावा शिवडी सी लिंक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे.
7)मासेमारी ,शेती,विटभट्टी,रेती,बागायती,या व्यवसायांचे पूनर्वसन सिडकोने केलेल नाही त्यामूळे सिडकोवरील विश्वास उडाला आहे
कोणाला दिले अर्ज
मुख्यमंत्री,महसूल मंत्री,नगर विकास मंत्री,विरोधी पक्षनेते, स्थानिक आमदार,खासदार,कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, मेट्रोसेंटर उरण, तहसिलदार उरण,पंचायत समिती उरण,भूमी अभिलेख उरण








Be First to Comment