|| श्री गुरवे नमः ||
विचारधारा-१ जीवन
आजकाल कोणालाच कोणाच्या व्यथा ऐकून घेण्याची जाणीव किंबहुना इच्छाच नसते कारण जो तो स्वतःलाच सर्वात दुःखी समजत असतो.
मग वेळ आहे कुणाला की, दुसऱ्याच्या जागी स्वतःला मानून त्याची व्यथा जाणून घेण्यासाठी.
काळ हा असाच बदलत चाललाय. खरे पहावे तर सर्वात सुखी हा मनुष्यप्राणी. पण अति लोभ नि देवाचा कोप यामुळे त्रस्त झालेला मनुष्य आपली स्वतःहूनच नैराश्येकडे दिशा वळवित आहे.
प्रत्येक युगात देवाने दाखवले की, ‘ जग हे सुंदर आहे, तेव्हा सुकृती करा; विकृती नको ‘. हा बोध जणू लोप होत चालला आहे.
तेव्हा,
विचार करावा चांगला;
अन् सदाचारच अंगीकारावा.
दुर्लक्ष करावे नैराश्येकडे;
व पहावे सुंदर जगाकडे.
करण्यास बहु चांगले येथे;
असावा हा आत्मविश्वास इथे.
आपणच व्हावे शिल्पकार स्वजीवनाचे;
कारण स्वजीवनरुपी जग हे सुंदर आहे…
✍️लेखिका ✍️
श्वेता जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment