आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीने केला निषेध
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये बुधवारी झालेल्या ‘सिडको हटाव, भूमिपूत्र बचाव’ आंदोलनाला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीने पाठिंबा देत या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीने शिरढोण गावामध्ये कोरोना नियमांचे पालन करीत सिडको प्रशासनाचा निषेध केला.
येथील भूमिपूत्राचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी ‘चले जाव सिडको ’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या.
या निषेध आंदोलनामध्ये शिरढोण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय भोपी, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीचे उपाध्यक्ष रोशन पवार, सचिव संग्राम भोपी, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद कर्णेकर, हॉटेल व्यावसायिक सतीश वाकडीकर, दत्ता मुकादम, सुनील मुकादम आदींनी सहभाग घेतला.








Be First to Comment