नवी मुंबई शहाबाज येथील शौचालय जनतेसाठी २४ तास केले खुले
सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई ।
शहाबाज सेक्टर १९ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालय रात्री ११ नंतर बंद केले जातात. याबाबत ची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आली असता त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रतिनिधी स्वाती भोईर व ओंकार दिलीप गंधे मनविसे शहरसहसचिव यांच्या समवेत सर्व विद्यार्थी सेना पदाधिकारी तसेच येथील नागरिक उपस्थित होते.
यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी शौचालय २४ तास उपलब्ध करून दिले.एकीकडे महापालिका स्वच्छ अभियानात १ क्रमांक पटकावण्याचे स्वप्न बघते तर दुसरीकडे त्यांच्या महापालिका शौचालयात असलेली दुरावस्था तसेच साफसफाई कडे दुर्लक्ष करीत असल्याचे सत्य यावेळी उघड झाले.
Be First to Comment