Press "Enter" to skip to content

पनवेल मध्ये दोन नवीन हायमास्ट चे लोकार्पण

शे.का. प.नगरसेविका डॉ सौ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून लावण्यात आले दोन हाय मास्ट

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

शे.का. प.नगरसेविका डॉ सौ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून लावण्यात आलेल्या दोन हाय मास्ट चे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोकार्पण करण्यात आले.

नगरसेविका डॉ सौ सुरेखा विलास मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून नागरिकांच्या मागणीनुसार गोखले हॉल जवळ व छत्रपती संभाजी महाराज मैदान – मांडवकर वाडा येथे असे दोन हाय मास्ट लावण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला यांचे उद्घाटन करण्यात आले.

नवी मुंबई येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ. पल्लवी हेडायू व फिजीशीयन डॉ. मयूर हेडायू यांच्या हस्ते गोखले हॉल येथील हाय मास्टचे उद्घाटन करण्यात आले.संभाजी महाराज मैदान येथील विजेच्या खांबाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीमती शामल आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरच्या उद्घाटन प्रसंगी श्री. व सौ. मृणाल प्रभाकर विचारे, सौ.मनीषा परदेशी, श्री.धामणकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री.शिरोडकर ,श्री काशिद, श्री.विश्वनाथ शहा व डॉ. विलास मोहोकर तसेच इतर नागरिक उपस्थित होते. याचदिवशी प्र. क्र.18.मधील महाराणा प्रताप मार्ग ,स्वामी नित्यानंद मार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले.यास्तव नागरिकांनी समाधान व्यक्त करुन आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.