पुढच्या वर्षी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पिंगळसई ग्राम पंचायतीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन झालेच पाहिजे : खा.सुनिल तटकरे
प्रदीप देशमुख,दीपक देशमुख यांचे कौतुक
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
दत्ताजिराव तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दी पासून या गावाने विशेषतः या विभागाने आम्हा तटकरे कुटुंबियांवर सर्वांनीच प्रेम केले आहे.अदिती तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यामध्ये पिंगळसई भागाचा मोठा वाटा होता या भागातून विक्रमी मताधिक्य घेत अदिती तटकरे जि.प अध्यक्ष झाल्या त्यामुळे या भागाचा विकास आता झपाट्याने होताना दिसत आहे.आज झालेल्या भुमिपूजनाने पुढच्या वर्षी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पिंगळसई ग्राम पंचायतीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन लवकरात लवकर झालेच पाहिजे असे मत खा.सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

शुक्रवार सायंकाळी ग्रामपंचायत पिंगळसई नळपाणी पाईप लाइनचे उद्घाटन समारंभ व ग्रामपंचायतच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील,प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर,नंदकुमार म्हात्रे,राजेंद्र पोकळे,प्रदीप आप्पा देशमुख,दीपक देशमुख,माजी सरपंच अनंत देशमुख, वरसे ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर सुर्वे,नरेश देशमुख,ग्रामस्थ,वारकरी,तरुण वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.


आपल्या भाषणात पुढे संबोधित करताना ते म्हणाले की,ग्रामपंचायतीचा विस्तार वाढावा म्हणून नुतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. प्रदीप आप्पा देशमुख,दीपक देशमुख व परिवाराने मन मोठे करून स्वतःची चार गुंठे जागा ग्रामपंचायतीला दिल्याने पुढील पिढीसमोर एक आदर्श ठेवला असल्याने प्रदीप देशमुख,दीपक देशमुख या बंधूंचे त्यांनी कौतुक केले.तर रोहा तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रवासाची साधने वाढायला पाहिजे म्हणून रोहा- दिवा शटल सेवा वाढवायच्या आहेत,राष्ट्रीय पेयजल अंतर्गत कामे,गावागावातील विकासकामे, अवचितगडावर जाण्यासाठी मेढा व पिंगळसई दोन्ही मार्गी जाता येईल यासाठी भरीव निधी उपलब्ध केला असल्याचेही त्यांनी सांगितले.


केंद्र सरकारने आमच्या हक्काचा खासदार निधी थांबवला असला तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आघाडी सरकारने भरीव निधीच्या बाबतीत रायगड व रत्नागिरीला झुकत माप दिले आहे.धाटाव,महाड व लोटे परशुराम एमआयडीसीतील दुषित पाणी खाडीत सोडले जाते, मात्र भरतीच्या वेळी ते दुषित पाणी पुन्हा कुंडलिका,सावित्री व वशीष्ठ नदीला मिळते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.हे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी व कायमस्वरुपी निकाली लावण्यासाठी कारखाण्यातील दुषित पाणी खोल समुद्रात सोडण्यासाठी तरतूद करत असल्याचे सांगितले.तसेच महाविकास आघाडी सरकार राज्यातील तालुक्यातील आरोग्य,शिक्षण, पायाभूत सुविधा व रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलत आहे. त्यामुळे रोहा तालुक्याचा विकासही गतिमान होत आहे असे ते शेवटी म्हणाले.
दरम्यान कार्यक्रमात खा.सुनील तटकरे यांचे वारकरी मंडलिच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक माजी सरपंच अनंत देशमुख यांनी केले.तर सुत्रसंचालन व आभार रवी दिघे यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच शारदा पाशिलकर,उपसरपंच प्रसाद देशमुख,सदस्य बबन मोहिते,सोपान मोहिते, दिपाली जाधव,श्वेता देशमुख,वर्षा फुलारे,ग्रामसेविका देवता भंडारी यांसह अमोल देशमुख,संकेत देशमुख,प्रफुल देशमुख,देविदास देशमुख,सचिन देशमुख,तेजस देशमुख,प्रशांत देशमुख यांसह तरुण वर्गाने विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment