Press "Enter" to skip to content

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे  

पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित नगरसेवक नितीन पाटील यांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पायोनिअर विभागात बसथांबा, मिनीहायमस्ट तसेच तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनी हायमस्ट व उपजिल्हा रुग्णालय ते जेष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशा विविध विकासकामांचा लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित झाले.  

या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका सुहासनी शिवणेकर, माजी नगरसेवक प्रदीप सावंत,  डी .आर .भोईर, माजी नगरसेविका निता माळी, भाजपा उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजपा पनवेल शहर महिला मोर्चा सरचिटणीस लीना पाटील, उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश इनामदार, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, शहर सहसंयोजक मनोज पाटील, सोशल मिडिया शहर सदस्य रुपेश नागवेकर,  प्रभाग क्र.१८ अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, जयश्री तांबोळी, अदिती मराठे, उपेंद्र मराठे, महेश सरदेसाई, विजय डिसोझा, सागर मंगवणी, सनी बैद, मयूर चिटणीस, संदेश भोईर, राजा चव्हाण, राजेंद्र पाटील, अभिजित दातार, प्रवीण काणे  तसेच प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध विकासकामे करण्यासंदर्भात नगरसेवक नितीन पाटील नेहमीच पुढे राहिले आहेत. नागरिकांना काय हवे याची जाणीव ठेवून ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. त्या अनुषंगाने त्यांच्या निधीतून कामे केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी त्यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.