Press "Enter" to skip to content

आंबिवली नविन वसाहत ते स्मशानभूमी रस्त्याचे काम सुरू

माजी सरपंच संदिप मुंढे आणि संदिप म्हात्रे यांच्या प्रयत्नातून होतोय रस्ता

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आली आंबिवली गावाच्या परीसरात नव्याने वसाहत झाल्या असून तेथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नविन वसाहतीत ये जा करण्यासाठी झाडा-झुडपांतून पायवाट शोधत प्रवास करावा लागत असल्याने भविष्यात धोका संभवू शकतो.हि समस्या तेथील नागरिकांनी माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांना सांगितली.

यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे यांनी या वसाहतीत येवून परीसराची पाहणी केली आणि नागरिकांची समस्या जाणून घेतली.व ताबडतोब जेसीबी च्या साहाय्याने झाडेझुडपे बाजूला करून पायवाटेला रस्त्याचा आकार दिला.
आली आंबिवली नवीन वसाहत ते मोहोपाडा स्मशानभूमी हा रस्ता चारशे मीटरपेक्षा जास्त लांबीचा असून त्याचे काम माजी सरपंच संदिप मुंढे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांच्या प्रयत्नातून सुरू झाले आहे.

दरम्यान आंबिवली नविन वसाहत ते मोहोपाडा स्मशानभूमी या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच ताईं पवार, उपसरपंच राकेश खारकर,माजी सरपंच संदिप मुंढे, ग्रामपंचायत सदस्य अंजना भोईर, संतोष मैदर्गींकर,स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड, सुप्रिया गायकर,सुभाष अहिर, कैलास म्हात्रे, भालचंद्र राऊत, संदिप म्हात्रे,जेष्ठ नागरिक पांडुरंग भौड, चिक्या भोईंर,करन जाधव, सुनील जाधव, मिलिंद कावडे,काशिनाथ काठावले,विनायक गायकवाड, भोईर, चव्हाण आदी उपस्थित होते.

हा रस्ता खडी,ग्रीटचा असून रोडरोलरच्या माध्यमातून बनविला जाणार असून रस्त्याचे काम सुरू झाले आहे.आली आंबिवली नविन वसाहत ते मोहोपाडा स्मशानभूमी रस्त्याचे काम सुरू झाल्याने तेथील नागरिकांनी माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.