प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महिला पोलीस व उन्हात भाजी विकणा-या महिलांचा सन्मान
सिटी बेल लाइव्ह । यवतमाळ ।
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलीस ठाणे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आजचा एक दिवस महिलांच्या स्वातंत्र्याचा दिवस समजला जातो. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मानही केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.
याप्रसंगी सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पी एस आय लता पगलवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांनी लता पगलवाड, व पोलीस महिला कर्मचारी यांचे स्वागत व सन्मान केला. भर उन्हात भाजी विकणाऱ्या आजीचा सन्मानही तेवढ्याच उत्साहात करण्यात आला.


यावेळी अल्काताई मुंडे, धडाडी समाजिक कार्यकर्त्या, मुख्यध्यापिका एगड मँडम सनरेज स्कुल प्रा. निलोफर प्राध्यापक तसेच धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या उपाध्यक्षा शिलाताई शिरगिरे, अध्यक्षा नंदाताई वाघमोडे अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. पोलिस ठाणेच्या सन्माननीय लता पगलवाड व पोलीस कर्मचारी भावनाताई, मनीषाताई, पीएसआय घाटोळ, सर्व पोलिस कर्मचारी सर्व मेजर सर्व होमगार्ड, ठाकुर, चव्हाण, सरनाईक, राठोड, मेजर नेवकर, पंतगे, शेळके, संतोष राठोड यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.









Be First to Comment