Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचाततीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव : चार पाॅजिटीव्ह

कोरोना महामारीच संकट मानगुटीवरच, नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

सध्या संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट ओढावले आहे, गेल्या वर्षंभरात अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.त्यातच सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होऊन जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. लहानथोरांना काही सुचेनासे झाले आहे. शासन आपल्या परीने नागरीकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करत आहे.नागरीकही आपापल्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न करुन कोरोनाशी चार हात दुर राहुन आपला जीव वाचवून प्रपंचाचा गाडा हाकत आहे.तर काही नागरिक हसण्यावर घालवून कोरोनासारख्या आजाराला हास्यपद टोमणे मारुन मजाक करीत आहेत.

कोरोना महामारीच संकट मानगुटीवरच येऊन बसल आहे. कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच कोरोनाने पुन्हा दोन महिन्यानंतर रसायनीत शिरकाव करून परीसरात भीती निर्माण केली आहे.यातच चांभार्री रिस हद्दीत एक तर मोहोपाडा येथे तीन रुग्ण नव्याने आढलले आहेत.

कोरोना पाश्र्वभूमीवर याअगोदरही वासांने मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात सर्वाधिक होती.सध्या खालापूर तालूक्यात 54 पाॅजिटीव्ह कोरोना रुग्ण असून एकूण 3071 मधील 2895 रुग्ण बरे झाले आहेत.तर एकूण 125 मयत असून खालापूर तालुक्यात 54 रुग्ण पाॅजिटीव्ह आहेत .यातील चौक मंडलात एकूण 1005 रुग्णसंख्या झाली आहे.

दरम्यान वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील रिस येथे एक तर मोहोपाडा येथे तीन कोरोना रुग्ण आढलल्याने परीसरात पुन्हा घबराट पसरली आहे.तरी नागरिकांनी सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन मास्क वापरून आपली व आपल्या कुटुंबियांची कालजी घ्यावी असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.