Press "Enter" to skip to content

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल घोषित

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

शरद क्रीडा व सांस्कृतिक   प्रतिष्ठानच्यावतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ‘कवितेतून निवेदन’ या विषयावरील राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेत 688 कवींनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती शरद क्रीडा व संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली.

या राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषित करण्यात आला. प्रथम पारितोषिकाचे स्वरूप १० हजार रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असून हे पारितोषिक राजेंद्र बाबुराव ऊगले नाशिक, गणेश महादेव औरंगे, श्रीगोंदा, संतोष राऊत ,लोणंद, सातारा या तीन जणांना विभागून देण्यात आले.

द्वितीय पारितोषिक ७ हजार प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह स्वप्निल गोसावी बार्शी, शिरीष पद्माकर देशमुख जालना, सौ. विणा विकास बाविस्कर जळगाव या तीन जणांना विभागून देण्यात आले.

तृतीय पारितोषिक ५ हजार रूपये विष्णू संकपाळ औरंगाबाद, जयश्री औताडे गंगाखेड परभणी, अलका अरुण वढावकर पुणे या तीन जणांना विभागून देण्यात आले.
तर उत्तेजनार्थ एकूण पंचवीस पारितोषिके घोषित करण्यात आली असून या पारितोषिकाचे स्वरूप सन्मानपत्र आणि स्मृती चिन्ह आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिकाचे विजेते विजय सातपुते पुणे, कविता पाचांग्रे शिरूर, साईनाथ फुसे सिल्लोड, मनिषा वाणी सुरत, मृणाल गीते नाशिक, अविनाश ठाकूर ठाणे, आनंद ढाले यवतमाळ, डाॅ. वंदना जाधव उस्मानाबाद, दिप्ती यादव रत्नागिरी, अंजली तांबे नाशिक, गणेश निकम चाळीसगाव, संदीप तोडकर रत्नागिरी, संध्याराणी कोल्हे उस्मानाबाद, लिलादेवी पाटील चाळीसगाव, श्रद्धा जोशी डोंबिवली, सुचिता बुधे वर्धा, क्रांती पंडित पुणे, शारदा मालपाणी अमरावती, रविकांत शार्दूल नाशिक, मनिषा पाटील जळगाव, शरदचंद्र साकुरीकर पुणे, वनिता पोकळे अमरावती, हेमा जाधव पुणे, विलास बोर्डे औरंगाबाद, शिवा चौधरी जळगाव, हे ठरले.
सदरील पारितोषिकांचे वितरण एका मोठ्या कार्यक्रमात करण्यात येणार  आहे. तसेच या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व कविता एकत्र करून त्याचे निवेदन केंद्र व राज्य सरकारला देण्यात येणार आहे. अनेकदा निवेदन देऊनही केंद्र सरकारने अद्यापही मराठी भाषेला “अभिजात भाषेचा दर्जा” दिलेला नाही तो दर्जा मिळावा याकरिता “निवेदन रूपी कवितांच्या”माध्यमातून राज्य व केंद्र सरकारला जाग यावी यासाठी हा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे अनोखा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया मुख्य संयोजक संदीप राक्षे तसेच संयोजक नंदकुमार बंड, डाॅ ललित आधाने ,रायगड जिल्हा सचिव राकेश खराडे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.