Press "Enter" to skip to content

ॲड. संदिप बागडे यांना राष्ट्रीय पुरस्कार

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील शेलु गावातील ॲड. संदिप गोपाळ बागडे हे व्यवसायाने जरी वकील असले तरी त्यांनी आपला काव्य लेखनाचा छंद जपत अनेक विषयांवर कविता केल्या असून अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन अनेक वेळा मानांकन मिळविले आहे.

लॉक डाऊन कालावधीत त्यांनी वेळेचा सदुपयोग करून छंद जोपासताना अनेक स्पर्धेत भाग घेऊन मानांकन मिळविले आहेत. यापूर्वी त्यांच्या कवितेला “छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान 2020” या स्पर्धेत “भावस्पर्शी” मानांकन मिळाले होते. त्यांच्या कवितेतून सामाजिक संदेश दिला जात असल्याने “शब्दगंध समुह प्रकाशन औरंगाबाद” यांचेकडून त्यांना “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ॲड. संदिप बागडे यांची साहित्य क्षेत्रात कवी म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.